तालखेड फाटा येथे एक तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:18+5:302021-06-23T04:22:18+5:30
माजलगाव : तालुक्यातील तालखेड फाटा येथे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणप्रश्नी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संयोजक ...

तालखेड फाटा येथे एक तास रास्ता रोको
माजलगाव : तालुक्यातील तालखेड फाटा येथे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणप्रश्नी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संयोजक जीवन राठोड यांनी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पूर्ववत न केल्यास सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मत व्यक्त करून हे आंदोलन व्यापक करण्याचे आव्हान केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य शरद चव्हाण यांनी राज्य आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता करण्याची विनंती केली. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य प्रा. प्रकाश गवते आणि बी. एम. पवार तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पी. टी. चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, माणिक पवार, दत्ता लबासे, सुदामराव पवार, मोहन पवार, कृष्णा पवार, अनिल राठोड, सुनील चव्हाण, प्रकाश चव्हाण, संजय गणगे, प्रकाश राठोड उपस्थित होते.
===Photopath===
220621\purusttam karva_img-20210622-wa0019_14.jpg