चोरून दारू विक्री, एकास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:30+5:302021-02-05T08:23:30+5:30

केज येथे २४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे त्यांचे सहकारी बाळासाहेब अहंकारे व दिलीप गीतेसोबत सायंकाळी ६:३० ...

Stealing liquor sales, caught one | चोरून दारू विक्री, एकास पकडले

चोरून दारू विक्री, एकास पकडले

केज येथे २४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे त्यांचे सहकारी बाळासाहेब अहंकारे व दिलीप गीतेसोबत सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान केज शहरात गस्त घालीत असताना केज-अंबाजोगाई रोडवरील सोनिजवळा फाट्याजवळ अनिल सीताराम सत्वधर हा बेकायदेशीररीत्या चोरट्या मार्गाने देशी व विदेशी दारू विक्री करीत होता. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, बाळासाहेब अहंकारे आणि दिलीप गीते यांनी छापा मारला असता त्यांना अनिल सत्वधर हा इसम टँगोपंच व मॅक्डॉल कंपनीच्या देशी व विदेशी दारू विक्री करीत असताना आढळून आला. पोलिसांनी छापा मारून त्याच्या ताब्यातील मॅक्डॉल आणि टॅंगोपंच या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या भरलेल्या बॉक्ससह अनिल सत्वधर यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध केज पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा ६५(ई)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Stealing liquor sales, caught one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.