परिचारिकांचे राज्यव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:35+5:302021-06-23T04:22:35+5:30
अंबाजोगाई : कोरोनाकाळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ...

परिचारिकांचे राज्यव्यापी आंदोलन
अंबाजोगाई : कोरोनाकाळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य करा, अन्यथा २५ जूनपासून बेमुदत संप पुकारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे. आजपासून या आंदोलनाची सुरुवात केली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय येथील परिचारिकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील सर्व परिचारिका कोविड रुग्णांना सातत्याने जीवाची बाजी लावून सेवा देत आहेत. या काळात इतर सर्व विभागांतील कर्मचारी घरी बसून होते. परंतु, परिचारिकांनी आपल्या कुटुंबापासून मुलाबाळांपासून दूर राहून रुग्णसेवा दिली. मागील वर्षी राज्यातील परिचारिकांनी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. मात्र, अद्याप या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. राज्यात परिचारिकांचे मनुष्यबळ अत्यंत अपुरे आहे. त्यामुळे आहे त्या परिचारिकांवर काम करताना प्रचंड ताण पडतो. कोरोना रोटेशन काळात शासनाने परिचारिकांची साप्ताहिक सुटीही बंद केली. जीवाची बाजी लावून लढणाऱ्या परिचारिकांकडे शासन अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करत असून, आता परिचारिकांच्या सहनशीलतेची सीमा संपली असून, आजपासून काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात केली आहे. या वेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष आशा यादव, सचिव सय्यद नजीर, छाया सानप, वैजंता काळे, सय्यद समीर, प्रमोद केंडे, किरण मनोहर, प्रियंका काळे, रेखा घोडकेसह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या आहेत मागण्या
परिचारिकांची पदे १०० टक्के भरावीत. परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता ७२०० देण्यात यावा. क्वारंटाइन रजा व साप्ताहिक सुटी देण्यात यावी. परिचारिकांचे पदनाम बदल करण्यात यावे. कोरोनाकाळात सर्व रजा स्थगित केल्यामुळे ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहून रद्द होत आहेत. त्या शिल्लक ठेवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी. ७व्या वेतन आयोगाचे व महागाई भत्त्याचे थकीत हप्ते देण्यात यावे, अशा मागण्या आहेत.
===Photopath===
220621\avinash mudegaonkar_img-20210622-wa0023_14.jpg