बीड येथे राज्यस्तरीय वंजारी वधू-वर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST2021-02-06T05:03:04+5:302021-02-06T05:03:04+5:30
बीड : बीड येथे राज्यस्तरीय वंजारी वधू-वर मेळावा ७ फेब्रुवारी २१ रोजी १० ते ५ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

बीड येथे राज्यस्तरीय वंजारी वधू-वर मेळावा
बीड : बीड येथे राज्यस्तरीय वंजारी वधू-वर मेळावा ७ फेब्रुवारी २१ रोजी १० ते ५ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नगर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय १३ व्या वंजारी समाज वधू-वर परिचय मेळाव्यास जिल्हा तसेच राज्यातील उप वधू-वर व पालक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंजारी सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब हंगे यांनी केले आहे.
मातृभूमी प्रतिष्ठान बीड संचलित अखिल भारतीय संत भगवान बाबा वंजारी समाज वधू-वर नोंदणी महासंघ तथा वंजारी विश्व वधू-वर बीडच्या वतीने डॉ. संजय तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री क्षेत्र मीराबाई संस्थान,(महासांगवी, ता. पाटोदा) मठाधिपती महंत राधाताई महाराज यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, प्रकाश आघाव पाटील तसेच बीड जिल्हा शल्य चिकित्सक सूर्यकांत गीते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरील मेळाव्यास बीड जिल्ह्यासह राज्यातील उप वधू-वर पालक, समाजबांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वंजारी सेवा संघ जिल्हा शाखा बीडच्या वतीने राज्य सहसचिव भाऊसाहेब मिसाळ, विभागीय उपाध्यक्ष महेश गर्जे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब हंगे, कार्याध्यक्ष विनोद गर्जे, सचिव सचिन हंगे, उपाध्यक्ष बाळासाहेब नागरगोजे, लक्ष्मण ढाकणे आदींनी केले आहे.