एकता मराठी साहित्य संमेलनाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST2021-02-05T08:21:49+5:302021-02-05T08:21:49+5:30
शिरुरकासार : तालुक्यातील मानूर येथे एकता फाउंडेशनच्या वतीने श्रीगुरूविरूपाक्ष साहित्य नगरीत तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे १७ व १८ ...

एकता मराठी साहित्य संमेलनाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
शिरुरकासार : तालुक्यातील मानूर येथे एकता फाउंडेशनच्या वतीने श्रीगुरूविरूपाक्ष साहित्य नगरीत तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे १७ व १८ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनानिमित्त राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.
एकता फाउंडेशनचे सदस्य दीपक महाले आणि राजेश बीडकर यांनी ही माहिती दिली. रेणुका विद्यालय मानूर येथे मुख्याध्यापक शशिकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रा.डाॅ.भास्कर बडे, गोकुळ पवार, कैलास तुपे, नितीन कैतके, हरिप्रसाद गाडेकर आणि अनंत कराड यांनी राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली. प्रभाकर शेळके(जालना,उत्कृष्ट कथासंग्रह), विनायक पवार (रायगड, उत्कृष्ट काव्यसंग्रह), रंजना सानप (खटाव, उत्कृष्ट कादंबरी), एकनाथ आव्हाड, किरण भावसार (उत्कृष्ट बालसाहित्य), रवींद्र जवादे (मूर्तिजापूर, उत्कृष्ट ललित लेखन), बबन धुमाळ (दौंड,उत्कृष्ट गझलसंग्रह), डॉ.ज्योती कदम (नांदेड, उत्कृष्ट संशोधन/संपादन), संजय एस.बर्वे (नागपूर, उत्कृष्ट संकिर्ण) यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.