हरभरा खरेदी केंद्र सुरु करा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगावात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:17 IST2018-02-15T18:15:29+5:302018-02-15T18:17:06+5:30
हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा, कर्ज माफीच्या याद्या जाहीर करा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज सकाळी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

हरभरा खरेदी केंद्र सुरु करा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगावात धरणे आंदोलन
माजलगाव (बीड) : हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा, कर्ज माफीच्या याद्या जाहीर करा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज सकाळी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात हरभ-याचे उत्पादन झाले आहे. मात्र, येथे शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र नसल्याने शेतकर्यांकडून व्यापारी कमी भावाने हरभरा खरेदी करत आहेत. यामुळे शासनाने हमी भावाने हरभरा खरेदी केंद्र सुरु करावे तसेच कर्ज माफीची यादी जाहीर करण्यात यावी या मागण्यासाठी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजता तालुका सहाय्यक निंबधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन सह.निबधक एस.बी. घुले यांना देण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्याची मागाणी शासनास कळविण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात बाजार समितीचे सभापती अशोक डक, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन दिपक जाधव, शिवाजी रांजवण, जयद्रत नरवडे, बालासाहेब जाधव, शेख मंजुर, निळकंठ भोसले, डॉ. मन्सबदार, शंतनू सोळंके, नासेर पठाण, सिद्धेश्वर खराडे यांचा सहभाग होता.