शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा ११ व्या प्रयत्नांत उत्तीर्ण; कणखर वडिल अन् जिद्दी कृष्णाची अनोखी कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 17:03 IST

SSC Result 2024: वडिलांच्या प्रोत्साहनांमुळे कृष्णा देत राहिला परीक्षा, यंदा पास होताच ग्रामस्थांनी काढली मिरवणूक 

परळी (बीड) : सहा वर्षाच्या काळात दहा वेळा दहावीची परीक्षा दिली पण यश काही प्राप्त होत नव्हते. यंदा अकराव्या प्रयत्नात गणित विषयात ३५ मार्क घेत कृष्णा अखेर दहावी उत्तीर्ण झाला. कायम प्रोत्साहन देणाऱ्या वडिलांची इच्छा जिद्दीने मुलाने पूर्ण केल्याने ग्रामस्थांनी त्याची गावातून मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला. ही अनोखी कहाणी आहे परळी तालुक्यातील डाबी गावातील कृष्णा मुंडे याची. 

परळी तालुक्यातील डाबी गावातील येथील कृष्णा नामदेव मुंडे याने पहिल्यांदा २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली. यावेळी एकाच विषयात तो उत्तीर्ण झाला. मंजूर असलेले वडील नामदेव मुंडे यांनी कृष्णाला प्रोत्साहन देत पुन्हा परीक्षा देण्यास सांगितले. वडिलांच्या आग्रहावरून कृष्णाने दहावीची परीक्षा अकरा वेळेस दिली. पहिल्या दहा प्रयत्नांत एक एक करून विषय निघाले. पण गणित विषय अवघड वाटत असल्याने यंदा कृष्णाने तयारी करत ११ व्या वेळेस दहावीच्या परीक्षेला सामोरे गेला. 

मजूर नामदेव मुंडे हे डाबी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील आहे. आपला मुलगा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे ही त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा. कृष्णा मुंडे याने २०१८ मध्ये पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली परंतु या परीक्षेत त्याला काही यश प्राप्त झाले नाही. त्यानंतरच्या दहा परीक्षेतही एखादा विषय मागे राहायचाच. अनेकदा यशाने हुलकावणी दिली तरीही वडिलांच्या आग्रहानुसार कृष्णा परीक्षा देत राहिला. अखेर यंदा कृष्णाच्या प्रयत्नांना यश आले. 

यंदा गणित विषयात ३५ गुण मिळवत कृष्णा दहावीत पास झाला. यासोबत दहा वर्षांच्या मेहनतीने त्याला ४९ टक्के मिळाले आहेत. तालुक्यातील टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल डाबी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत कृष्णाची वाजत गाजत मिरवणूक काढली. यासोबतच वडील नामदेव मुंडे यांनीही आपल्या मुलगा मोठ्या प्रयत्नाने दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालBeedबीड