लोकमत आयोजित रक्तदान शिबिरास माजलगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:30+5:302021-07-11T04:23:30+5:30

रक्तदान शिबिराचा शुभारंभ नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, ...

Spontaneous response in Lokmat organized blood donation camp in Majalgaon | लोकमत आयोजित रक्तदान शिबिरास माजलगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत आयोजित रक्तदान शिबिरास माजलगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिराचा शुभारंभ नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, भाजपचे नेते रमेश आडसकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते.

माजलगाव : लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने येथील वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेंतर्गत १० जुलै रोजी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांसह विविध व्यापारी संघटना, विविध सेवाभावी संस्थांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. दिवसभर मान्यवरांनी या शिबिरास भेटी दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.

जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीमार्फत हे रक्तदान करण्यात आले. या शिबिरास शहरातील लोकमत सखी मंच, तालुका व्यापारी महासंघ, किराणा असोसिएशन, महाराष्ट्र आरोग्य मित्र, रोटरी क्लब, नगर परिषदेचे कर्मचारी संघटना आदींनी सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्‌घाटन नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, माजलगाव मतदार संघाचे भाजपचे नेते रमेश आडसकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते. यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम करवा यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी सर्व मान्यवरांनी लोकमतने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

या कार्यक्रमास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पो. काॅ. विनायक अंकुशे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश साखरे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत, नगरसेवक नितीन मुंदडा, भाजपचे शहराध्यक्ष माणिक दळवे व शहर उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, एस. नारायण, ईश्वर खुर्पे, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवहर शेटे, अशोक वाडेकर, शिवसेनेचे अमोल डाके, रोटरीचे अध्यक्ष गजेंद्र खोत, रंजित राठोड, रो. प्रभाकर शेटे ,फ्लाईंग बर्ड्‌स अकॅडमीचे संचालक पांडुरंग चांडक, जिव्हाळा प्रतिष्ठानचे डॉ. अजय डाके, डॉ. राजेश रुद्रवार, मधुकर आवारे, नारायण टकले, विनोद जाधव, बालासाहेब झोडगे, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोळंके, कापड संघटनेचे अध्यक्ष शशिकिरण गडम, व्यापारी महासंघाचे रियाज काजी, आरोग्य मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष जेथलिया व तालुकाध्यक्ष गणेश लोहिया, वैजनाथ घायतिडक, माहेश्वरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद जाजू व सचिव उमेश जेथलिया, दासू बादाडे, मनोज फरके, राजू गिल्डा, दत्ता येवले, शुभम करवा, गौरव भुतडा, गोकुळ पवार, आपुलकी ग्रुपचे सुभाष नन्नावरे, दत्ता भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा रक्तपेढी रुग्णालय बीडचे बिभीषण म्हत्रे, नितीन साळुंके, दादाराव कुंभकर, उत्तमराव राऊत उपस्थित होते. तसेच पार्टनर म्हनून श्री ओम स्टीलतर्फे प्रशांत वाघमारे, विशाल जाधवर, अत्तार सुबानी, ट्रीफ बिस्किटचे ताहेर शेख होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक घरत यांनी तर आभारप्रदर्शन तेजस कुलथे यांनी केले.

याप्रसंगी लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी हजेरी लावत रक्तदानही केले. यावेळी अर्चना बोरा, शांता नन्नावरे, स्नेहल पांडे, शर्मिला सोळंके, मीरा इंगले, अनिता शिंदे, सुप्रिया सोळंके, अश्विनी सोळंके, योगिता इंगळे यांनी सहभाग नोंदविला. यावेळी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोळंके व त्यांच्या पत्नी विद्या संजय सोळंके यांनी सोबत रक्तदान केले.

तीन भावी उमेदवारांची उपस्थिती

लोकमतने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अशोक डक, रमेश आडसकर व अप्पासाहेब जाधव हे तिघेही आगामी निवडणुकीत माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदारकीचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहू शकतात. या तिघांनाही लोकमतने या कार्यक्रमात एकत्र आणले, याचीच चर्चा कार्यक्रमात सुरू होती.

100721\10_2_bed_47_10072021_14.jpg

लोकमत शिबीर

Web Title: Spontaneous response in Lokmat organized blood donation camp in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.