लोकमत आयोजित रक्तदान शिबिरास धारूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:14+5:302021-07-08T04:23:14+5:30

किल्लेधारूर : लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ...

Spontaneous response in Lokmat organized blood donation camp in Dharur | लोकमत आयोजित रक्तदान शिबिरास धारूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत आयोजित रक्तदान शिबिरास धारूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

किल्लेधारूर : लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध सेवाभावी संस्थांनी या शिबिरास सहकार्य केले. दिवसभर मान्यवरानी या शिबिरास भेट दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले. अंबाजोगाई येथील स्वा.रा. ती. रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीस हे रक्तदान करण्यात आले. येथील कर्मचारी वर्गानी दिवसभर परिश्रम घेतले.

धारूर येथे लोकमतचे वतीने डाॕॅ. पी. एस. मुंडे यांच्या रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शहरातील वसुंधरा मित्रमंडळ, कायाकल्प प्रतिष्ठान, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, किल्लेधारूर युथ क्लब आदी संस्थाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीस हे रक्तदान करण्यात आले.

या शिबिराचे उद्‌घाटन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे, नगरसेवक राजूशेठ कोमटवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फावडे, रक्तपेढीच्या पथक प्रमुख डाॅ. अनुराधा मुंडे, पत्रकार अनिल वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, बालासाहेब जाधव, महादेव शिनगारे, डाॕॅ. पी. एस. मुंडे, डाॕॅ. मयूर सांवत, अॕॅड. मोहन भोसले, बालासाहेब चव्हाण, सादेक इनामदार, रोहनसिंह हजारी, गौतम शेंडगे, दिनेश कापसे, विजय शिनगारे, सय्यद शाकेर, चंद्रकांत देशपांडे, महादेव देशमुख, सुनील कावळे, राजू मोरे, सतीश वाकुडे, राजकुमार बोरगावकर, सूर्यकांत जगताप, रवी गायसमुद्रे, शेख इरफान, विश्वानंद तोष्णीवाल, ईश्वर उमप आदी उपस्थित होते.

रक्तपेढीचे पथक प्रमुख डाॕॅ. अनुराधा मुंडे, जगदीश रामदासी, शशीकांत पाखरे, शेख बाबा, बालाजी पडणे यांनी परिश्रम घेतले.

या शिबिरास दिवसभरात मान्यवरानी भेटी दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डाॕॅ. चेतन आदमाने, प्रा. अशोक लाखे, प्रा. डी. बी. जाधव, प्रा. बाबू सांवत, आर्य वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन डुबे, कृष्णा भावठानकर, विजय पिलाजी, सुरेश शिनगारे, अनिल तिवारी, प्रकाश तोष्णीवाल, कृष्णा महाजन, संदीप शिनगारे, ज्ञानेश्वर शिंदे, रमेश नखाते, उमेश शेटे, अजित शिनगारे रवी चोले, अॕड संजय चोले, राम शेळके सहशिक्षिका प्रतिभा करपे आदी मान्यवरानी रक्तदान शिबिरास भेट दिली.

उद्या आष्टी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

आष्टी : आष्टी येथील जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा पोलिस ठाणे शेजारी येथे जीवनराज चॅरिटेबल फाउंडेशन अहमदनगर ब्लड बँकच्या रक्तपेढीच्या सहकार्याने ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ तर सायंकाळी ५ वाजता समारोप करण्यात येणार आहे. शहरातील व तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व रक्तदात्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

रक्तदानासाठी यांचे आवाहन

‘लोकमत’ने २ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे. आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ, व्यापारी असोसिएशन, बी. डी. हंबर्डे महाविद्यालय, सहकार प्रतिष्ठान, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आर्यन्स ग्रुप, साहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र, आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, टायगर ग्रुप, जिवा महाले युवा मंच, महात्मा फुले प्रतिष्ठान, अटल क्रीडा मंडळ सुलेमान देवळा, पोलीस दक्षमित्र, शिवराजे ग्रुप कडा यांच्यासह विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते या रक्तदानाच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या सर्वांनी रक्तदान करण्यासाठी आवाहन केले आहे. ज्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी अविनाश कदम - ९४२३३९५४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे

070721\07_2_bed_23_07072021_14.jpeg

रक्तदान शिबिर

Web Title: Spontaneous response in Lokmat organized blood donation camp in Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.