परळीत महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:31+5:302021-07-20T04:23:31+5:30
परळी : येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज मंदिरात १९ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व लोकमतच्या वतीने घेण्यात आलेल्या महारक्तदान ...

परळीत महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
परळी : येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज मंदिरात १९ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व लोकमतच्या वतीने घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. या शिबिराचा शुभारंभ बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तीन दाम्पत्याने व अठरा वर्षाच्या मुलानेही रक्तदानामध्ये सहभाग नोंदविला.
लोकमत रक्ताचं नातं या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी शहर, तालुका व लोकमतच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ व पक्षातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अनंत इंगळे, शंकर कापसे यांनी केले. यावेळी सूर्यकांत इंगळे, पंचशीला इंगळे, राजू हरदास, अलका हरदास, विजयेंद्र देशमुख, निकिता देशमुख या दाम्पत्याने रक्तदान केले, तसेच १८ वर्षीय अक्षय कांबळे यांनीही रक्तदान केले. पाथरी येथून दुचाकीवर खास महारक्तदान शिबिरासाठी भगवान पौळ, जयराम पौळ यांनी हजेरी लावून आपले रक्तदान केले आहे, तसेच पत्रकारांनी व परळी शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ. सुजित कमोड, डॉ. दत्ता चिकटकर, अधीक्षक शशिकांत पारखे, तंत्रज्ञ मोरे, प्रिया गालफाडे व बाबा शेख, श्रीराम कुंजटवाड, बालाजी पडगी यांनी यावेळी परिश्रम घेतले, तसेच आरोग्यसेवक रोशन मुंडे, परिचारिका राजश्री जगतकर, प्रतिभा हानवते, हरीश ताटे, शैलेश ताटे यांनीही सहकार्य केले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान मुंडे, प्रा. डॉ. मधुकरराव आघाव, राजाभाऊ पौळ, राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस अनंत इंगळे , हाजी बाबू, शंकर कापसे, आजिज कच्छी, राजेंद्र सोनी, रवी मुळे, श्याम दासुद, शरद कावरे, जितेंद्र नव्हाडे, पल्लवी भोईटे, नितीन कुलकर्णी, प्रा. विनोद जगतकर, रा. काँ. उपाध्यक्ष सुरेश टाक, आयुब पठाण, संतोष शिंदे, श्रीकांत ढेले, मनजीत सुगरे, सय्यद सिराज, विजय भोयटे, शंकर आडेपवार आदी उपस्थित होते. लोकमत पार्टनर म्हणून श्री ओम स्टीलतर्फे प्रशांत वाघमारे, विशाल जाधवर, अत्तार सुबानी हे होते. ट्रिप बिस्कीटतर्फे शेख ताहेर, विजयकुमार शिंदे हे उपस्थित होते.