श्री क्षेत्र चाकरवाडीत ६१ दात्यांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST2021-06-26T04:24:08+5:302021-06-26T04:24:08+5:30

श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन बीड : विसाव्या शतकातील महान संतविभूति श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ...

Spontaneous blood donation of 61 donors in Shri Kshetra Chakarwadi | श्री क्षेत्र चाकरवाडीत ६१ दात्यांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

श्री क्षेत्र चाकरवाडीत ६१ दात्यांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन

बीड : विसाव्या शतकातील महान संतविभूति श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी येथे २४ जून रोजी आयोजित शिबिरात ६१ दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कोरोना महामारीमुळे माऊली संस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी झाला नाही. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे ह.भ.प.महादेव महाराज यांच्या सहमतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरासाठी महादेव महाराज चाकरवाडीकर, नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, पत्रकार गम्मत भंडारी,बालाजी मारगुडे,अशोक शिंदे ,प्रा. पांडुरंग फाटक ,सुंदर बापू शिंदे, चंद्रकांत शिंदे ,जितेंद्र शिंदे, बंडू कदम, नितीन ताटे, गणेश मोरे, महेंद्र काटकर,ज्ञानोबा अनवणे, मंचिक पवार ,विलास जाधव,श्रीमंत मोरे, लखन वरपे, धम्मदीप वंजारे, बाबूराव आनवणे, सचिन घोडके ,अक्षय घोडके ,राजेश कवडे, शशिकांत डोईफोडे, प्रशांत अनवणे, गोविंद वाळके, बाळनाथ डोईफोडे ,उमेश पवार तसेच श्री क्षेत्र चाकरवाडी परिसरातील अनेक ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. शिवसंग्राम नेकनुरचे गटप्रमुख विनोद कवडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. चाकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पल्लवी कवड़े यांनी आभार मानले.

===Photopath===

240621\313624_2_bed_27_24062021_14.jpg

===Caption===

चाकरवाडीत रक्तदान

Web Title: Spontaneous blood donation of 61 donors in Shri Kshetra Chakarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.