रेवकी येथे ४० दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:39+5:302021-06-17T04:23:39+5:30

गेवराई : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील रेवकी देवकी येथे मल्हार आर्मी ग्रुपच्या वतीने आयोजित शिबिरात ४० ...

Spontaneous blood donation of 40 donors at Revaki | रेवकी येथे ४० दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

रेवकी येथे ४० दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

गेवराई : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील रेवकी देवकी येथे मल्हार आर्मी ग्रुपच्या वतीने आयोजित शिबिरात ४० दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन मल्हार आर्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे म्हणून बी. एम. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के, युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू देवकते, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, गणपत काकडे, जालिंदर पिसाळ, दत्ता पिसाळ, विलास देवकते, सरपंच संभाजी चोरमले, माजी सरपंच रोहिदास सौंदलकर, गजानन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीस राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब नरोटे, राजेंद्र ढेकळे, गजराज सौंदलकर, गजानन खताळ, गोकुळ चोरमले, अशोक खताळ, कृष्णा सौंदलकर, लक्ष्मण सजगणे, बाळू चोरमले, पांडुरंग सौंदलकर, नीलकंठ चोरमले आदी उपस्थित होते.

===Photopath===

160621\16_2_bed_16_16062021_14.jpg

===Caption===

रेवकी रक्तदान शिबीर

Web Title: Spontaneous blood donation of 40 donors at Revaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.