शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Beed: आजारी नातेवाईकास भेटून परतणाऱ्या दोन वीटभट्टी कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:32 IST

Beed News: भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दोन वीटभट्टी कामगारांचा जागीच मृत्यू

- मधुकर सिरसटकेज : तालुक्यातील कळंब अंबाजोगाई महामार्गांवर सावळेश्वर व औरंगपूर शिवाराच्या सीमेवर बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान भरधावं पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन वीटभट्टी कामगार जागीच ठार झाले. सुभाष आश्रुबा मोहिते (50) आणि सुनिल भीमराव पवार ( 40, दोघेही रा बार्शी, ह. मु. सातेफळ वीटभट्टी) अशी मृतांची नावे आहेत.

बार्शी येथील काही कामगार अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथील वीटभट्टीवर काम करतात. नातेवाईक आजारी असल्यामुळे येथील सुभाष आश्रुबा मोहिते आणि सुनिल भीमराव पवार हे दोन कामगार दुचाकीवरून ( क्रमांक एम एच 25 / ए बी 4198) बार्शीला गेले होते. बुधवारी दोघेही परत सातेफळकडे निघाले. यावेळी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान सावळेश्वर व औरंगपूर शिवाराच्या सीमेवर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव पिकअकने ( क्रमांक एम एच 20  /जी सी 2108) जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. 

माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस कर्मचारी सीताराम डोंगरे, गणेश राऊत, महादेव केदार, रामनाथ वारे यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

वीटभट्टीवर शोककळादरम्यान, दोन कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू  झाल्याची वार्ता अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारातील वीट भट्टीवर समजली. यामुळे वीटभट्टी परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू