खरीप मशागतीला वेग; शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:11 AM2019-05-20T00:11:39+5:302019-05-20T00:12:18+5:30

रीप हंगामातील पेरणीसाठी काही दिवस उरेल आहेत. पेरणीपुर्वीच्या मशागतीला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी बियाणांची व खतांची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

Speed of kharif crops; The eyes of the farmers' sky | खरीप मशागतीला वेग; शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे

खरीप मशागतीला वेग; शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाची तयारी पूर्ण : ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर क्षेत्र, खते-बियाणांचे सूक्ष्म नियोजन

प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खरीप हंगामातील पेरणीसाठी काही दिवस उरेल आहेत. पेरणीपुर्वीच्या मशागतीला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी बियाणांची व खतांची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. कापूस, बाजरी, सोयबीन, तूर, मूग, उडीद यासह इतर पिकांची दर्जेदार बियाणांचे नियोजन

कृषी विभागाने केले आहे. मशागत वेगाने सुरु असली तरी बळीराजाचे डोळे मात्र आभाळाकडे आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर आहे. यावर कापूस, सोयबाीन, तूर, खरीप ज्वारी, बाजरी, मका यासह इतर पिके घेतली जातात. गतवर्षी पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी होते. बोंडअळी व इतर रोगांमुळे कापूस, सोयबीन या मुख्य पिकांचा उतारा कमी आला. त्यामुळे शेतकरी सर्व बाजूने कोंडीत सापडला होता. मात्र, पुन्हा या संकटावर मात करत खरीप हंगामातील पेरणीसाठी मशागतीस सुरुवात केली आहे. यावर्षी कृषी विभागाने खरीप हंगामातील सर्व पिकांचे बियाणे महाबीज व इतर कंपन्यांकडून मागणीनुसार पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सोयबीन बियाणांसाठी ५२ हजार क्ंिवटल बियाणांची मागणी महाबीजकडे दिली असून खाजगी कंपन्यामार्फत १७ हजार १८२ क्ंिव. बियाणे पुरवले जाणार आहे. कापसासाठी लोकप्रिय सर्व खासगी कंपन्यांच्या बियाणांचे देखील सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना दर्जेदार व पुरेसे बियाणे व खतांचा पुरवठा होणार आहे.
यावर्षीसाठी २.५९ लाख मे. टन खतांची मागणी
बियाणांच्या नियोजनानंतर पिकांसाठी आवश्यक असलेल्या युरिया, डी.ए.पी. एस.एस.पी, एम.ओ.पी.,संयुक्त खते, मिश्र खते यांचे मिळून २ लाख ५९ हजार मेट्रीक टन खताची मागणी २०१९-२० खरीप पिकांसाठी करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षीचा ३३ हजार मे.टन खताचा काठा शिल्लक आहे. त्यामुळे खताचा तुटवडा भासणार नसल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त केले जात आहे.
फसवणूक टाळण्यासाठी तपासणी
बोगस बियाणे व खते याची विक्री होऊन शेतकºयांची फसवणूक होऊ नये साठी संबंधीत अधिकाºयांकडून सर्व कृषी केंद्रावर खतांचे व बियांनांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. तसेच गौरप्रकार कुठे आढळून आल्यानंतर संबंधित दुकानदारांवर कारवाई होणार आहे.

Web Title: Speed of kharif crops; The eyes of the farmers' sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.