नगराध्यक्षांच्या हस्ते सभापतींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:41+5:302021-07-04T04:22:41+5:30
फोटो कडक उन्हाने साशंकता वाढविली शिरुर कासार : तालुक्यात जवळपास आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. शेतकामाचा उरक झाला. मात्र, ...

नगराध्यक्षांच्या हस्ते सभापतींचा सत्कार
फोटो
कडक उन्हाने साशंकता वाढविली
शिरुर कासार : तालुक्यात जवळपास आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. शेतकामाचा उरक झाला. मात्र, सध्या रोज पडत असलेल्या कडक उन्हामुळे पावसाबाबत साशंकता वाटू लागली आहे. तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
आजारांनी डोके वर काढले
शिरुर कासार : गेल्या वर्षभरापासून कोरोना या महामारीने सर्वांनाच वेठीस धरले होते. लहान, मोठे आजार जवळपास सुप्तावस्थेत गेले होते. मात्र, सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असली, तरी थंडी, ताप, अंगदुखी, हातापायाला गोळे, कंबरदुखी अशा पोट आजारांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
प्रा.शहादेव डोंगर याना पीएच.डी.
शिरुर कासार : येथील कालिकादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्रा.शहादेव डोंगर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली. डोंगरे यांनी ‘बीड जिल्ह्यातील गुजर समाजशास्त्रीय अभ्यास’ हा शोधप्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता, त्यास मान्यता मिळाली. याबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
फोटो
एकनाथ महाराजांच्या पादुकांचे दर्शन यंदाही नाही
शिरुरकासार : तालुक्यातून जवळपास शिरुरसह दहा ते बारा गावांवरून पैठण येथून नाथांचा पालखी सोहळा पंढरीकडे जात असतो. या निमित्ताने संत पादुकांच्या दर्शनाचा लाभ होत मिळतो. काही भाविक या सोहळ्यात सहभागी होऊन पायी चालत जात असतात. मात्र, याही वर्षी कोरोनामुळे तालुक्यातील भाविकांना संतपादुका दर्शनाला व सहवासाला मुकावे लागणार आहे.
030721\img-20210702-wa0077.jpg
बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभुषन क्षिरसागर यांनी शुक्रवारी पंचायत समिती सभापती उषाताई सरवदे यांचा सत्कार करून कामाचे कौतूक केले