गेवराई खरेदी-विक्री संघामार्फत ज्वारी, हरभरा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:42+5:302021-06-23T04:22:42+5:30
गेवराई : गेवराई तालुका खरेदी-विक्री संघामार्फत ज्वारी आणि हरभरा खरेदी सुरू करण्यात आली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला माल शासकीय ...

गेवराई खरेदी-विक्री संघामार्फत ज्वारी, हरभरा खरेदी
गेवराई : गेवराई तालुका खरेदी-विक्री संघामार्फत ज्वारी आणि हरभरा खरेदी सुरू करण्यात आली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला माल शासकीय खरेदी केंद्रावरच विक्रीसाठी आणावा, जेणेकरून मालाला चांगली किंमत मिळेल, असे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. गेवराई येथील शासकीय गोडाऊन येथे ज्वारी आणि हरभरा खरेदीचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
तालुका खरेदी-विक्री संघामार्फत शासकीय गोडाऊन येथे ज्वारी व हरभरा खरेदीचा शुभारंभ २२ जून रोजी जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष तथा जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, नायब तहसीलदार श्यामसुंदर रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विजयसिंह पंडित म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय आतापर्यंत झाले आहेत. शेतमालाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी शासनाने पूर्ण तयारी केली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रावरच विक्रीसाठी माल आणावा. ज्वारीची खरेदी शासकीय गोडाऊन येथे तर हरभरा खरेदी-विक्री संघ गेवराई येथे खरेदी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
या वेळी श्रीराम आरगडे, रमेश खोपडे, राजेंद्र जगताप, गोपाळ तौर, शेख अनिस, दयानंद पाडुळे, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, संदीप मडके, वैजिनाथ टकले, जगदीश मराठे, श्याम रुकर, वसीम फारोकी, शेख शाहरुख, सरवर पठाण, गोरख चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे सचिव गरड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
220621\img-20210622-wa0311_14.jpg