सोनू, मी आलोय बरं ...! परीक्षा केंद्रावर प्रेयसीला भेटण्यासाठी प्रेमवीराचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:50 PM2020-03-04T12:50:55+5:302020-03-04T12:51:43+5:30

उत्साहीपणाला एका शिक्षकाने आक्षेप घेतला आणि त्याला इमारतीबाहेर हुसकावून दिले.

Sonu, remember I've come ...! Lover's struggle to meet a girl friend at the examination center | सोनू, मी आलोय बरं ...! परीक्षा केंद्रावर प्रेयसीला भेटण्यासाठी प्रेमवीराचा आटापिटा

सोनू, मी आलोय बरं ...! परीक्षा केंद्रावर प्रेयसीला भेटण्यासाठी प्रेमवीराचा आटापिटा

Next
ठळक मुद्देमुलीला मी इथवर येण्याचा प्रयत्न केला; एवढे बाहेरून सांगू तरी द्या‘मॅडम, मी काही कॉप्या द्यायला आलेलो नाही.

कडा ता. आष्टी (जि. बीड) :  प्रेयसीसाठी वाट्टेल ते करणारे प्रियकर चित्रपटांतून व प्रत्यक्षातही आपण पाहतो. असाच एक प्रेमवीर मंगळवारी कडा येथे परीक्षा केंद्रावर पाहावयास मिळाला. बाहेर थांबून परीक्षार्थी मैत्रिणीला धीर देणे, एवढाच त्याचा उद्देश होता.

आष्टी तालुक्यातील विविध केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडली. या परीक्षेच्या निमित्ताने अशा अनेक हौशा, नवश्यांची गर्दी परीक्षा केंद्रावर होत असते. गर्दी करणारे काही सोबत म्हणून तर काही कॉप्या पुरवायला येत असतात. यंदा तालुक्यातील बहुतेक परीक्षा केंद्रांवर वातावरण कडक होते. त्यामुळे बाहेरून कॉप्या पुरविणाऱ्यांची पंचाईत झाली. मंगळवारच्या पेपरला कडा येथे एक जण प्रत्येक हॉलसमोर जाऊन त्याच्या मैत्रिणीला हाक मारायचा. त्याच्या या उत्साहीपणाला एका शिक्षकाने आक्षेप घेतला आणि त्याला इमारतीबाहेर हुसकावून दिले.

पेपर संपण्यास अर्धा तास शिल्लक असताना तो परत आला आणि शोधक नजरेने सगळे हॉल बाहेरून पाहू लागला. एका वर्गावर असलेल्या मॅडमनी त्याला हटकले. त्यावर तो गयावया करत म्हणाला, ‘मॅडम, मी काही कॉप्या द्यायला आलेलो नाही. आता अर्धा तास उरला असताना मी काय मदत करणार? पण कृपया मला त्या मुलीला मी इथवर येण्याचा प्रयत्न केला; एवढे बाहेरून सांगू तरी द्या,’ अशी त्याने विनंती केली. त्यांचे बोलणे ऐकून एका दुसऱ्या विद्यार्थ्यांने सांगितले की, तो जिला शोधतो आहे, ती खालच्या मजल्यावर आहे. तेव्हा तो पळतच तिकडे गेला आणि त्या वर्गात ती दिसताच ‘सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही का? मी आलोय बरं’ असे बाहेरून म्हणताच त्याला हायसे वाटले.

Web Title: Sonu, remember I've come ...! Lover's struggle to meet a girl friend at the examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.