शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या; आईनेही दिली मुलाला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 13:51 IST

वडिलांसोबत पैस्यांवरून नेहमी आई आणि मुलाचा वाद होत असे.

केज (बीड ): खर्चासाठी  पैसे न दिल्याने आईच्या मदतीने मुलाने वडिलांना तिफणीने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आई व मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची घटना दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील बेंगळवाडी येथे घडली होती.

रमेश सोनाजी शिंदे तालुक्यातील बेंगळवाडी येथे पत्नी हिराबाई व मुलगा ऋषिकेशसह राहतात. हिराबाई आणि ऋषिकेश यांचा रमेश यांच्यासोबत पैस्यांवरून कायम वाद होत असे. यातून अनेकदा त्या दोघांनी रमेश यांना मारहाण केली. दरम्यान, दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास  हिराबाई आणि ऋषिकेश रमेशकडे खर्चासाठी पैसे मागीतले. मात्र, त्यांनी नकार दिला. यामुळे त्यांच्यात पुन्हा पैशावरून जोरदार वाद झाला.

चिडलेल्या ऋषिकेशने घराच्या अंगणात पडलेला तिफणीचा फणा वडिलांच्या डोक्यात मारला. यात रमेश जबर जखमी झाले असतानाही ऋषिकेशने मारहाण सुरूच ठेवली. त्याला हिराबाईने आणखी मारण्यासाठी प्रोत्साहन दिले. रमेशचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि ग्रामस्थ झाले. त्यांनी जखमी अवस्थेतील रमेश यांना उपचारासाठी नेकनूर आणि नंतर बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.  

दरम्यान, प्रकृती नाजूक झाल्याने रमेशला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले. तिथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रमेश शिंदे यांचा सोमवारी दुपारी ४ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी मयत रमेशचा भाऊ बाबुराव सोनाजी शिंदे यांनी केज पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून हिराबाई व ऋषिकेश या आई-मुलावर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी पाटील करत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू