गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST2021-02-06T05:03:15+5:302021-02-06T05:03:15+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवता आणि सर्वधर्मसमभाव या विचारांच्या मूल्यावर ‘गुरुदास सेवा आश्रम’ चालतो. या आश्रमास अनेक मूलभूत ...

Solar lamp visit to Gurudas Seva Ashram | गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा भेट

गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा भेट

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवता आणि सर्वधर्मसमभाव या विचारांच्या मूल्यावर ‘गुरुदास सेवा आश्रम’ चालतो. या आश्रमास अनेक मूलभूत गरजा अत्यावश्यक आहेत. सातत्याने जिथे अडचण येईल, तिथे मदतीचा हात देत असतात. सौर पथदिवा या आश्रमात समाधी स्थळाजवळ बसविण्यात आला. यामुळे आश्रमात आता वीज खंडित झाली तरी सौरदिव्याच्या माध्यमातून प्रकाश मिळणार आहे.

यावेळी आश्रमातील वृद्धांना फराळाचे वाटप करण्यात आले. यापूर्वीही स्व.पंडितअण्णा मुंडे व स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ आश्रमाला विजेवर चालणारे हायमास्ट बसविण्यात आलेले आहेत.

यावेळी बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, नगरसेवक अनिल आष्टेकर, महादेव रोडे, जयराज देशमुख युवानेते अनंत इंगळे, लालाभाई पठाण, धोंडीराम धोत्रे, जितेंद्र नव्हाडे, शशिकांत बिराजदार, श्रीपाद पाठक, अनिल घेवारे, बडे यांच्यासह आश्रमामधील लालजी महाराज, चंदू महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुदास आश्रमातील सर्व वृद्ध सेवाधारी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Solar lamp visit to Gurudas Seva Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.