Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे, खंडणी प्रकरणावरुनच मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे, दमानिया यांनी ट्विट करुन वाल्मीक कराड याच्या वाईन शॉपचा तपशील देत आरोप केले आहेत.
इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही 'भारतपोल' लाँच; पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार
वाल्मीक कराड याला अनेकांनी समाज सुधारक असं संबोधले आहे. यावरुन दमानिया यांनी समाज सुधार वाल्मीक कराड याचे चार ते पाच वाईन शॉप असल्याचा आरोप केला आहे. या ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी पुरावे दिले आहेत. वाल्मीक कराड याची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनशॉप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अंजली दमानिया यांच्या ट्विटमध्ये काय आहे?
"एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले, ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली.
पत्रात लिहिले आहे की, समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाइन ची दुकाने आहेत. प्रत्येक वाइन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे.
ही जमीन केज येथे १,६९,००,००० २९/११/२४ ला घेतली आणि ३ दिवसात परवानगी दिली गेली. सात बारा १५ दिवसानंतर होतो पण सगळे कायदे कसे धाब्यावर लावण्यात येतात याचे उदाहरण, असा आरोपही अंजली दमानिया यांनी केला.
४ दिवसांची पोलिस कोठडी
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूर हत्या केल्याच्या आरोपातील विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत, तर अन्य जयराम चाटे, महेश केदार व प्रतीक घुले या तीन आरोपींना १८ जानेवारीपर्यंत १३ दिवस पोलिस कोठडीचे आदेश केज न्यायालयाचे प्रमुख न्या. एस. व्ही. पावसकर यांनी सोमवारी दिले. दरम्यान, १८ डिसेंबरला विष्णू चाटे याला अटक करून त्याची पोलिस कोठडी घेतली असली तरी त्याने अद्याप आपला मोबाइल तपास अधिकाऱ्यांना दिलेला नाही.