शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत चोरट्यांचा धुडगूस; दोन दिवसांत दोन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:38 IST

शहरात मागील काही महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकात भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यातील चोऱ्यांचे तपास प्रलंबित असतानाच गुरूवार आणि शुक्रवारी माळीनगर आणि छत्रपती कॉलनीत सलग दोन चो-या करत चोरट्यांनी पोलीसांना उघड आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देसव्वादोन लाखाचा ऐवज लंपास : पोलिसांना उघड आव्हान

अंबाजोगाई : शहरात मागील काही महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकात भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यातील चोऱ्यांचे तपास प्रलंबित असतानाच गुरूवार आणि शुक्रवारी माळीनगर आणि छत्रपती कॉलनीत सलग दोन चो-या करत चोरट्यांनी पोलीसांना उघड आव्हान दिले आहे. माळी नगरातील चोरीत तर अवघे तासभर घर बंद असतानाही चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला.पूस येथील शेतकरी उद्धव नागोराव उपाडे हे अंबाजोगाई शहरातील माळीनगर भागात लोचना आडसुळे यांच्याकडे किरायाने राहतात. गुरूवारी सकाळी मुले शाळेत गेल्यानंतर १० वाजता उद्धव हे मित्राकडे कामानिमित्त गेले. साडेबारा वाजता त्यांची पत्नी संगीता या मुलांच्या फिस भरण्यासाठी घराला कुलूप लावून शाळेत गेल्या. ही संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी हँडबॅगमधील १ लाख २८ हजार रुपए आणि कपाटातील सोन्याचे गंठन, झुंबर, बाळी, अंगठी, चांदीचे कडे आदी १ लाखांचे दागिने असा एकूण २ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला. दुपारी १.२५ वाजता संगीता शाळेतून परतल्या असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पतीला बोलावून घेतले आणि आत जाऊन पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. याप्रकरणी उद्धव उपाडे यांच्या फियार्दीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरिक्षक सुचिता शिंगाडे करत आहेत.दुसरी चोरी छत्रपती नगरात झाली. येथील मोबाईल दुकान चालक युवराज उद्धवराव देशमुख यांच्या वडिलांना १ जुलै रोजी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे वडिलांच्या उपचारासाठी सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून सोलापूरला गेले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी युवराज यांची मावशीने घरात जाऊन कपडे घेतले आणि नंतर कुलूप लावून त्या निघून गेल्या. चोरट्यांनी गुरुवार सायंकाळनंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूमच्या कपाटातून सोन्याच्या अंगठ्या, सहा मोबाईल, चांदीचे दागिने आणि रोख ४० हजार असा एकूण १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. सोलापूरला गेलेल्या युवराज यांना शुक्रवारी आधार काडार्ची गरज भासू लागल्याने त्यांनी त्यांच्या मावशीला घराकडे पाठविले असता चोरीची घटना उघड झाली. त्यांनतर युवराज देशमुख यांनी तातडीने अंबाजोगाईला येत शहर पोलिसात तक्रार दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईtheftचोरीPoliceपोलिस