लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अपहरण, हरवलेली, पळून गेलेली किंवा गॅरेज, लॉज व इतर ठिकाणी काम करणाºया मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये रेकॉर्डवरील २०, तर रेकॉर्डशिवाय ४३ अशा ६३ मुलांचा शोध घेऊन त्यांच्या चेहºयावर ‘मुस्कान’ फुलविण्याचे काम पोलिसांनी केले आहे. पहिल्यांदाच रेकॉर्डवरील मुले एवढ्या मोठ्या प्रमाणात शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्या वतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम राबविली होती.प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतिरिक्त बेवारस बालके, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल, कारखाने, ढाबे या ठिकाणी काम करणारी, तसेच भीक मागणारे, कचरा गोळा करणारे व बालकामगार अशा १८ वर्षांखालील बालकांचा शोध घेण्यात आला. अशा ६३ मुलांचा शोध घेऊन त्यांना पालक व बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
‘आॅपरेशन’ मोहिमेतून ६३ मुलांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:56 IST
अपहरण, हरवलेली, पळून गेलेली किंवा गॅरेज, लॉज व इतर ठिकाणी काम करणाºया मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम हाती घेतली होती.
‘आॅपरेशन’ मोहिमेतून ६३ मुलांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’
ठळक मुद्देरेकॉर्डवरील २० तर गॅरेज, लॉजसह इतरत्र काम करणाºया ४३ मुलांची सुटका