भोजेवाडी तलावातील गाळ काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:07+5:302021-06-20T04:23:07+5:30
रस्त्याचे काम रखडले धानोरा : नगर-जामखेड रोडवरील धानोरा ते आष्टी दरम्यान डांबरीकरणाचे काम रखडले आहे. धानोरा-नगर दरम्यानचा रस्ता डांबरीकरण ...

भोजेवाडी तलावातील गाळ काढणार
रस्त्याचे काम रखडले
धानोरा : नगर-जामखेड रोडवरील धानोरा ते आष्टी दरम्यान डांबरीकरणाचे काम रखडले आहे. धानोरा-नगर दरम्यानचा रस्ता डांबरीकरण झाला आहे. आष्टी-जामखेड दरम्यान रस्त्याचे काम झाले आहे. तरी या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
...
रेल्वेच्या कामाला गती द्या
आष्टी : तालुक्यात नगर-परळी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. परंतु, हे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हे काम पूर्ण बंद पडले होते. तरी या कामाला गती मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
...
खड्डे बुजविण्याची मागणी
धानोरा : धानोरा ते सुलेमान देवळा रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेले आहे. परंतु, या रस्त्यावर शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी खोदलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत. तरी हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
...
पाऊस नसल्याने चिंता
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा, हिवरा, सुलमानदेवळा, सावरगाव, देऊळगाव परिसरात खरिपाच्या पेरण्यांनंतर पावसाने दडी मारली आहे. यामुळे पेरणी केलेली पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.