दहावीच्या परीक्षेत सहा परीक्षार्थी रस्टिकेट; शिक्षकावरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:40 IST2018-03-02T00:39:54+5:302018-03-02T00:40:43+5:30
राज्य माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारी सुरु झालेल्या दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपी बाळगणाºया सहा विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी परळी तालुक्यातील लाडझरी येथील परीक्षा केंद्रावर केलेल्या पाहणीत एका शिक्षकाजवळ भ्रमणध्वनी आढळून आल्याबद्दल त्याला परीक्षेच्या कामावरुन कमी केले.

दहावीच्या परीक्षेत सहा परीक्षार्थी रस्टिकेट; शिक्षकावरही कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारी सुरु झालेल्या दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपी बाळगणाºया सहा विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी परळी तालुक्यातील लाडझरी येथील परीक्षा केंद्रावर केलेल्या पाहणीत एका शिक्षकाजवळ भ्रमणध्वनी आढळून आल्याबद्दल त्याला परीक्षेच्या कामावरुन कमी केले.
जिल्ह्यात ४५ हजार ९३२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. गुरुवारी प्रथम भाषा विषयाची परीक्षा होती. वडवणी तालुक्यातील मंकाबाई विद्यालय परीक्षा केंद्रात उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्या पथकाने ३ विद्यार्थ्यांवर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई केली. तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद देवगावकर यांच्या पथकाने केज येथील सरस्वती कन्या विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यावर कारवाई केली.
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांच्या पथकाने बीड तालुक्यातील जवळ हायस्कूल जवळा येथील परीक्षा केंद्राची तपासणी केली. या वेळी कॉपी बाळगणाºया दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
शिक्षकाजवळ मोबाईल
परळी तालुक्यातील लाडझरी येथील परीक्षा केंद्राची मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी केली. या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत एका शिक्षकाकडे भ्रमणध्वनी आढळून आला. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला परीक्षेच्या कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोबाईल सीईओंकडे
होणार जमा
परीक्षा कालावधीत भरारी वा इतर नियंत्रण पथकाच्या पाहणीत परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकाकडे भ्रमणध्वनी आढळल्यास तो सीईओंकडे जमा केला जाणार असून परीक्षेनंतर तो सीईओंकडून परत घ्यावा लागणार आहे.
केंद्र प्रमुखांचे दुर्लक्ष, पर्यवेक्षक मजेत
दहावी, बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी नियंत्रणात आणण्यासाठी भरारी पथक कार्यरत आहेत. मात्र केंद्र प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक केंद्रांवर पर्यवेक्षकांची चांदी होत आहे. भ्रमणध्वनी तसेच प्रतिबंधित वस्तू सहजरीत्या बाळगल्या जात आहेत.