शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

दहापैकी सहा जणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST

लहान मुलांना आई-बाबांचा नंबर मात्र तोंडपाठ, मोठ्यांना का नाही? बीड : काळ बदलला काळासोबत विविध उपकरणेही बदलली याचा परिणाम ...

लहान मुलांना आई-बाबांचा नंबर मात्र तोंडपाठ, मोठ्यांना का नाही?

बीड : काळ बदलला काळासोबत विविध उपकरणेही बदलली याचा परिणाम माणसांच्या स्मरणशक्तीवर झाला. याचा रिऑलिटी चेक ‘लोकमत’ने केले. त्यासाठी बीड शहरातील काही चौकांत व कार्यालयांतील व्यक्तींशी संपर्क साधला. तर, अनेकांना आपल्या पत्नीचा नंबर पाठ नव्हता, तर काही पत्नींना आपल्या पतीदेवाचा मोबाईल नंबरही पाठ नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे त्यांच्या मुलांना आई व वडिलांचा मोबाईल नंबर मात्र पाठ होता.

मानसोपचार तज्ज्ञांनी याविषयात आपले मत मांडताना नागरिक आपल्या रिकॉल मेमरीचा वापर करत नाहीत. यामुळे असा प्रकार घडतो. असे ते म्हणाले. अद्ययावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक तर झाला, परंतु तो परावलंबी झाला. त्याचा मोबाईल बंद पडला तर, त्याची सर्व कामे ठप्प होत असल्याचा अनुभव देखील आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने रिकॉल मेमरीचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा मेमरी असून देखील त्याचा उपयोग होणार नाही.

लोकमत बीड

मला माझ्या वडिलांचा नंबर पाठ आहे. मात्र, बायकोचा नंबर लक्षात नाही

स्मार्ट फोनमुळे नंबर पाठ करण्याची गरजच राहिली नाही, त्यामुळे नंबर आठवत नाहीत

एटीएमचा पीननंबर देखील लक्षात राहत नसल्यामुळे मोबाईलमध्ये तो सेव्ह करून ठेवला आहे.

अडचणीच्या काळात मोबाईल बंद असेल तर, काहीच सुचत नाही, त्यामुळे काही नंबर डायरीत लिहून ठेवले जातात.

मला माझा आणि पत्नीचाच फक्त मोबाईल नंबर पाठ आहे.

मुलांना आठवते, मोठ्यांना का नाही ?

लहान मुलांना आपण वारंवार सांगून नंबर पाठ करून घेतो. त्यामुळे शॉर्ट मेमरी लाँगटर्म मेमरीमध्ये परिवर्तित होऊन नंबर लक्षात राहतो. मोबाईलमुळे मोठे व्यक्ती परावलंबी होऊन शॉर्ट मेमरीचा वापर करत नाहीत, अशी प्रतिक्रिया मानसोपचार तज्ज्ञांनी दिली. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळे सारखेच

मोबाईल आल्यापासून तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण नंबरच्या बाबतीत परावलंबी झाले आहेत.

पूर्वी मोबाईल नव्हता, त्यावेळेस प्रत्येकांना कुटुंबातील सदस्यांसह काही व्यक्तींचे लँडलाईन फोन नंबर तोंडपाठ असायचे.

आता नाव आठवल्यानंतर मोबाईलच्या मेमरी बॉक्समध्ये जाऊन नंबर काढले जातात. त्यातून रिकॉल मेमरी कमी होत आहे. यामुळे अनेकांना पाठ राहणारे नंबर ते पाहिल्याशिवाय सापडत नाहीत. बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना

दररोज पतीला आवर्जून फोन लावणाऱ्या महिला दिवसात अनेकवेळेस फोन लावतात. मात्र, काही महिला वगळल्या तर अनेकांना आपल्या पतीचा नंबर तोंडपाठ नाही. कारण, कोडवर्डमध्ये पतीदेवाचा नंबर त्यांनी सेव्ह केला आहे. एक गृहिणी

मला माझा, माझ्या पतीचा आणि मुलाचा नंबर पाठ आहे. मात्र, इतर नातेवाईकांचा नंबर लक्षात नाही. नेहमी त्यांच्याशी काम पडत असले तरी मोबाईलमधून नंबर काढल्यानंतर फोन लावते. त्यामुळे नंबर पाठ करणे गरजेचे वाटत नाही. एक गृहिणी पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ

प्रत्येक पालकाने आपला मुलगा कुठे विसरला तर, त्याला घरी परत येता यावं, म्हणून कुटुंबीयांनी त्याच्याकडून नंबर पाठ करून घेतला आहे. त्यामुळे त्याला आई-बाबांचा नंबर तोंडपाठ आहे. त्यामुळे तो मोबाईल न घेता नंबर सांगू सकतो. राहूल

मला माझे नाव, माझ्या शाळेचे नाव शिक्षकांची नावे आणि आई बाबाचा मोबाईल नंबर पाठ आहे. त्यामुळे गरज पडल्यास मी कोणाच्याही मोबाईलवरून आईला किंवा बाबाला फोन करून बोलतो.

स्वराज