सहा दिवसानंतर कोरोनामुळे दोघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:39+5:302020-12-29T04:32:39+5:30
बीड : तब्बल सहा दिवसांच्या खंडानंतर सोमवारी जिल्हा आरोग्य विभागाकडे दोन कोरोना बळींची नोंद झाली, तर दिवसभरात २२ नवे ...

सहा दिवसानंतर कोरोनामुळे दोघांचा बळी
बीड : तब्बल सहा दिवसांच्या खंडानंतर सोमवारी जिल्हा आरोग्य विभागाकडे दोन कोरोना बळींची नोंद झाली, तर दिवसभरात २२ नवे रुग्ण आढळले. ४० जणांनी काेरोनावर मात केली. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६ हजार ६६९ इतकी झाली आहे, तर १५ हजार ८९४ कोरोनामुक्त झाले आहेत. ५२८ जणांचा बळी गेला आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे सुरु असलेल्या मृत्यूसत्राला मागील सहा दिवसांत ब्रेक लागला होता. सहा दिवसांत एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. दरम्यान, सोमवारी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर दोन बळींची नोंद झाली. यामध्ये बीड शहरातील सावतामाळी चौक भागातील ७० वर्षीय पुरुष आणि बीड तालुक्यातील जुजगव्हाण येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात ४२४ जणांची काेविड चाचणी झाली. यामध्ये ४०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. २२ नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील २, आष्टी तालुक्यातील ४, बीड तालुक्यातील ७, गेवराई तालुक्यातील २, माजलगाव तालुक्यातील १, परळी तालुक्यात ४, शिरुर आणि वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला आहे. दिवसभरात ४० जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.