पथदिवे सुरू करण्यासाठी आपचा नगर परिषदेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:14+5:302021-03-23T04:36:14+5:30

नगरपरिषद कार्यालयात विद्युत विभागाचे कुणीही अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसतात, संपूर्ण शहर अंधारात आहे. नगर परिषद प्रशासन झोपेत आहे का? दोन ...

Sit in your city council to start the streetlights | पथदिवे सुरू करण्यासाठी आपचा नगर परिषदेत ठिय्या

पथदिवे सुरू करण्यासाठी आपचा नगर परिषदेत ठिय्या

नगरपरिषद कार्यालयात विद्युत विभागाचे कुणीही अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसतात, संपूर्ण शहर अंधारात आहे. नगर परिषद प्रशासन झोपेत आहे का? दोन दिवसात बीड नगर परिषदेने महावितरणचे बिल अदा करून तत्काळ बीड शहरातील लाईट चालू करावे या मागणीसाठी मुख्याधिकारी यांच्या कॅबिनबाहेर आम आदमी पक्षाचे ठिय्या आंदोलन झाले. जिल्हाध्यक्ष अशोक येडे व शहराध्यक्ष सय्यद सादेक यांनी आंदोलन केले. ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या आवारात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते.

‘अंधार नगरी’ करणारे कुठे आहेत ? प्रा. नवले

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण बीड शहर अंधारात आहे. बीड शहराला कोणी वाली आहे की नाही? ज्यांच्यावर बीड शहराची जबाबदारी बीडकरांनी टाकलेली आहे ते कुठे आहेत ? सायंकाळी बाहेर पडणारे वडीलधारे, महिला भगिनी यांना अंधारामुळे येणाऱ्या अडचणी त्यांना दिसत नाहीत का? विद्युत कंपनीचे बिल न भरल्यामुळे बीड शहर अंधारात असेल तर बिल भरण्याची जबाबदारी कोणाची? एक तर रस्त्यांचे बेहाल, तुंबलेल्या गटारी आणि त्यात रात्रीचा अंधार यामुळे राज्य शासनानेच हस्तक्षेप करुन बीडकरांना दिलासा द्यावा, असे प्रा. सुरेश नवले म्हणाले.

गुन्हे दाखल करा, उपोषण करणारच

१७ मार्च रोजी रोजी बीड जिल्हा एमआयएम व आम आदमी पार्टीच्या वतीने बीड शहरातील पथदिवे चालू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. दोन दिवसात चालू न झाल्यास उपोषणाचा इशारासुद्धा दिला. नगर परिषद प्रशासन हे कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेचा छळ करत आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही उपोषणाला बसणारच असे एमआयएमचे नगरसेवक अमर शेख म्हणाले.

आपच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केले असता नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून चर्चा केली.

===Photopath===

220321\22bed_21_22032021_14.jpg

===Caption===

अअ

Web Title: Sit in your city council to start the streetlights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.