शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

परिचारीकांचा संवाद बिघडला; रूग्ण, नातेवाईकांसोबत वाद वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 5:02 PM

मोजक्या परिचारीकांमुळे बीड जिल्हा रूग्णालय बदनाम

ठळक मुद्देगुन्हेगाराप्रमाणे देतात वागणूकमोजक्या परिचारीकांमुळे इतर परिचारीकाही बदनाम होत आहेत

बीड : आरोग्य सेवा देण्यात बीड जिल्हा रूग्णालय तत्पर असले तरी काही  परिचारीकांमुळे प्रतीमा मलीन होत चालली आहे. उपचार घेणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना काही परिचारीका उद्धट बोलतात. शिवाय रूग्णाची चौकशी केल्यावर व्यवस्थित माहिती न देता टोलवाटोलवी करीत असल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही परिचारीका मात्र, प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असल्याने आरोग्य सेवा दर्जेदार मिळत आहे.

कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, मोतीबिंंदु शस्त्रक्रिया करण्यात जिल्हा आरोग्य सेवा अव्वल आहे. त्यातच आता कायाकल्पमध्येही बीड जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्रांनी यश संपादन केले आहे. जिल्हा रूग्णालयाचाही क्रमांक थोड्या गुणाने चुकला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टिम यशस्वी काम करीत आहे. 

असे असले तरी जिल्हा रूग्णालयात काही काही  परिचारीका व डॉक्टर रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सन्मानजनक वागणूक देत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच अडचण विचारण्यास गेल्यावर त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. या मोजक्या उद्धट वर्तणूक देणाऱ्या परिचारीकांमुळे सर्वच परिचारीकांबद्दल संताप व्यक्त होत आहे. रूग्ण व नातेवाईकांना समाधानकारक माहिती देण्याबरोबरच त्यांना सन्माद द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ताण आहे, मात्र राग नको...रूग्ण संख्या लक्षात घेता परिचारीकांवर कामाचा ताण आहे, हे लक्षात येते. मात्र याचा ताण सर्वसामान्यांवर का काढावा? असा सवाल आहे. त्यांना सन्मान दिला जात नसल्याने वाद होत असल्याचे दिसून येत आहे. या मोजक्या परिचारीकांमुळे प्रामाणिक सेवा देणाऱ्या इतर परिचारीकाही बदनाम होत आहे.

गुन्हेगाराप्रमाणे देतात वागणूकवॉर्ड क्रमांक ७ मध्ये एका रूग्णाबद्दल नातेवाईक चौकशीला गेले होते. यावेळी येथील परिचारीकेने माहिती न देता डॉक्टरांना विचारा, असे सांगून टोलवाटोलवी केली. डॉक्टर दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होते. मग डॉक्टरची वाट पहात सर्वसामान्यांनी रात्र काढायची का? असा सवालही उपस्थित होत आहे. विचारपूस करायला गेल्यावर परिचारीका (काही) नातेवाईकांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत असल्याचे अनेक  प्रकार समोर आलेले आहेत.

मान द्या, सन्मान घ्या..उपचारासाठी आलेले रूग्ण व चौकशीसाठी आलेल्या नातेवाईकांना मान द्यावा. तरच त्यांचे समाधान होईल आणि ते सन्मान देतील. अन्यथा बोलण्यातून अनेकवेळा वाद झाल्याची उदाहरणे आहेत. प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिचारीकांचे नेहमीच माध्यमांनी स्वागतही केलेले आहे.

चौकशी करून कारवाई करू रूग्णावर उपचार करण्याबरोबरच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची चौकशी केल्यास माहिती द्यायला हरकत नाही. काही वाटल्यास तक्रार करा. चौकशी करून कारवाई करू.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा  शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर