शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून बहिणीवर तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:45 PM

घराजवळ कोणीतरी उभे असल्याचे पाहताना एका १५ वर्षीय मुलीचे तोंड दाबून घराच्या मागे नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार पाहणाऱ्या सदर मुलीच्या १३ वर्षीय बहिणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २० जून रोजी तालुक्यातील नागझरी येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

गेवराई : घराजवळ कोणीतरी उभे असल्याचे पाहताना एका १५ वर्षीय मुलीचे तोंड दाबून घराच्या मागे नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार पाहणाऱ्या सदर मुलीच्या १३ वर्षीय बहिणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २० जून रोजी तालुक्यातील नागझरी येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन २५ जून रोजी गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील नागझरी येथील १५ वर्षीय मुलगी आपल्या बहिणीसोबत घरात होती. त्याचवेळी २० जून रोजी रात्री १२ च्या सुमारास आपल्या घरासमोर कोणीतरी उभे आहे, हे पाहत असताना आरोपींनी तिचे तोंड दाबून घरामागे नेले. अत्याचार सुरू असताना बहिणीचा आवाज ऐकू आल्याने तिची १३ वर्षीय बहीण त्या ठिकाणी गेली असता आरोपींनी तिच्यावर तलवारीने वार केले. मानेवर व हाताच्या बोटावर वार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर ५ दिवसांनी गेवराई ठाण्यात २५ जून रोजी रात्री मुलीच्या फिर्यादीवरुन नारायण भारत पवार, पप्पु भारत पवार , देवगण विश्वास चव्हाण, शहादेव विश्वास चव्हाण व जावेद विश्वास चव्हाण या पाच आरोपींविरूद्ध गेवराई ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी फरार आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारे या करीत आहेत.मागील गुन्ह्याची पार्श्वभूमीदीड महिन्यापूर्वी नागझरी गावात मारहाणीत एकाचा खून झाला होता. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपी हे पीडित मुलीचे वडील आणि आई आहेत. मंगळवारी मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या आईला पोलिसांनी अटक केली. तर वडील फरार आहेत.नागझरी येथे २५ जून रोजी घडलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शहादेव विश्वास चव्हाण, जावेद विश्वास चव्हाण, देवगण विश्वास चव्हाण हे तिघेही सख्खे भाऊ आहेत. यातील जावेद हा दीड महिन्यांपूर्वी नागझरी येथे झालेल्या खून प्रकरणातील फिर्यादी आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संदर्भ आहे काय ? हे तपासात समोर येईल.पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीया प्रकरणी पीडितेला मेडिकलला पाठवले असून, या गुन्ह्याचा तपास योग्यरीतीने लावून गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारे यांनी सांगितले.बुधवारी बीड येथील जिल्हा रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी