आष्टी तालुक्यातील कडा येथील संभाजी इंगोले याची कडा डोंगरगण रोडलगत वडिलोपार्जित शेतजमीन आहे. ही जमीन वाटणी करून मागण्यासाठी गेलेले संभाजी इंगोले व त्याची बहीण मैनाबाई यांना त्यांचा भाऊ, भावजयी व पुतण्याने लोखंडी पाईप, गजाने बेदम मारहाण केली. यात मोठ्या प्रमाणावर मारहाण झाल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आष्टी पोलिसांनी यात मारहाणीची गुन्हा दाखल केला असला तरी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली असा ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जखमींकडून केली जात आहे.
संभाजी इंगोले यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब नामदेव इंगोले, कलम भाऊसाहेब इंगोले, प्रवीण भाऊसाहेब इंगोले यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करीत आहेत.