कठुआ आणि उन्नाव घटनांच्या निषेधार्त तलवाडा येथे मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:01 IST2018-04-19T14:01:52+5:302018-04-19T14:01:52+5:30
कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्त तलवाडा येथे नागरिकांनी आज सकाळी मूक मोर्चा काढून बंद पाळला.

कठुआ आणि उन्नाव घटनांच्या निषेधार्त तलवाडा येथे मूक मोर्चा
गेवराई (बीड ) : कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्त तलवाडा येथे नागरिकांनी आज सकाळी मूक मोर्चा काढून बंद पाळला.
तालुक्यातील तलवाडा येथे कठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणातील अारोंपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्यांना समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावे, पीडितांना व त्यांच्या कुटुबांना संरक्षण देण्यात यावे, याची सुनावणी जलगतीने न्यायालयात व्हावी या मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच या घटनेच्या निषेधार्त सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. मूक मोर्चात शिवसेना जि. प. सदस्य युवराज डोगरे, अॅड. सुरेश हत्ते, डॉ. राम धुमक, शाम कुडं, देविदास फलके, रवी मरकड, नजीर कुरेशी, मोलाना जाकेर, सुमेध करडे, गणेश कचरे आदींची उपस्थिती होती. मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांना देण्यात आले.