देशाच्या अखंडतेसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा संघर्ष अविस्मरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:52+5:302021-06-25T04:23:52+5:30
अंबाजोगाई : भारतमाता अखंड रहावी हे स्वप्न उराशी बाळगून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर प्रश्नावर संघर्ष केला. ३७० कलम ...

देशाच्या अखंडतेसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा संघर्ष अविस्मरणीय
अंबाजोगाई : भारतमाता अखंड रहावी हे स्वप्न उराशी बाळगून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर प्रश्नावर संघर्ष केला. ३७० कलम काश्मीरमधून उठविले. हीच खरी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली होय, असे प्रतिपादन दीनदयाळ बँकेच्या अध्यक्ष शरयू हेबाळकर यांनी केले.
भाजपच्या वतीने येथील खोलेश्वर महाविद्यालयात स्व. गोपीनाथराव मुंडे सभागृहात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा होते. व्यासपीठावर संस्थेचे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशोर गिरवलकर, भाजपचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी हेबाळकर यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनातील काही टप्पे सांगून त्यांनी केलेला संघर्ष विषद केला. राष्ट्रवाद, उद्योग, शेतीचा अभ्यास आणि स्वातंत्र्यानंतर भारत मातेच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा आणि ३७० कलम हे मुखर्जी यांचं स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केल्याचे त्या म्हणाल्या. अध्यक्षीय समारोप नंदकिशोर मुंदडा यांनी केला. यावेळी किशोर गिरवलकर, रामभाऊ कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. कालिदास चिटणीस यांनी केले. प्रा. बिभीषण फड यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. निशिकांत पाचेगावकर, प्रशांत आदनाक, वैजनाथ देशमुख, अनंत लोमटे, संतोष लोमटे, अमोल पवार, महेश अंबाड, अजय आडे, गौरव लामतुरे, गोपाळ मस्के, राहुल कापसे, माणिक पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
240621\24bed_2_24062021_14.jpg