शुभकल्याणचा चेअरमन आपेटच्या परळीतील घराची पोलीसांकडून झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 17:26 IST2018-03-03T17:26:12+5:302018-03-03T17:26:47+5:30
चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या चेअरमन व संचालकांविरूध्द फसवणुकीच्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेवून तक्रार केली होती.

शुभकल्याणचा चेअरमन आपेटच्या परळीतील घराची पोलीसांकडून झडती
परळी (बीड ) : चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या चेअरमन व संचालकांविरूध्द फसवणुकीच्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेवून तक्रार केली होती. त्यानंतर आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळीत येऊन मल्टीस्टेटचे चेअरमन दिलीप आपेट याच्या घराची झडती घेतली.
शुभ कल्याण मल्टीस्टेटच्या परळी येथील 2 शाखेत ठेवीदारांचे 4 कोटी रूपये आडकले आहेत. मुदत होवून ही ठेवींची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्हाभर आहे. यामुळे चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ठेवीदारांनी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या चेअरमन व संचालकांविरूध्द फसवणुकीच्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेवून तक्रार केली होती. यानंतर आज मल्टीस्टेटचे चेअरमन दिलीप आपेट याच्या पद्मावती गल्लीतील घराची आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने झडती घेतली. झडतीत त्यांना काही कागदपञ आढळली असल्याची माहिती संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी दिली. सदरील झडती आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय अधिकारी गाडे व पोलीस उपनिरीक्षक शेळके यांच्या पथकाने घेतली. झडतीनंतरही आर्थिक गुन्हा शाखेचे पथक आज संभाजी नगर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. पथकातील अधिकाऱ्यांनी अनेक ठेवीदारांशी चर्चा केली. त्यांच्याकडील ठेवीच्या पावत्या व बंधपञ याची माहितीची त्यांनी नोंद घेतली.
आपेट बाहेर राज्यात
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात या मल्टीटेटच्या 103 शाखा आहेत. यामुळे चेअरमन आपेट त्याचे कुटूंब व संचालक मंडळ हे महाराष्ट्राबाहेर गेल्याची शक्यता ठेवीदारांनी व्यक्त केली आहे.