तेलगावात श्रीमद्‌ भागवत कथेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:37 IST2021-02-20T05:37:33+5:302021-02-20T05:37:33+5:30

कित्येक महिन्यापासून घरकुलाचे हप्ते थकले बीड : कित्येक महिन्यापासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगर परिषदेकडून लाभार्थींच्या ...

Shrimad Bhagwat's story begins in Telgaon | तेलगावात श्रीमद्‌ भागवत कथेस प्रारंभ

तेलगावात श्रीमद्‌ भागवत कथेस प्रारंभ

कित्येक महिन्यापासून घरकुलाचे हप्ते थकले

बीड : कित्येक महिन्यापासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगर परिषदेकडून लाभार्थींच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत मागणी करूनदेखील आश्वासनाशिवाय लाभार्थींना काही मिळत नाही.

महासांगवीत मीराबाई संस्थानमध्ये सप्ताह

पाटोदा : श्रीक्षेत्र मीराबाई संस्थान, महासांगवी येथे संत मीराबाई आईसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरूवारपासून २३ वा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. वीणा पूजनाने प्रारंभ झाला. २५ फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. याप्रसंगी मठाधिपती राधाताई महाराज सानप, ज्ञानोबा गर्जे, सर्जेराव गर्जे, सद्‌गुरू गर्जे, कुसूम सानप, मधुकर गर्जे, महेंद्र गर्जे, सरपंच सुभाष अडागळे, स्वामी सानप, शिवाजी गर्जे, किसनदेव सानप, भाविक उपस्थित होते.

डीपी रोडवरील खड्डे बुजविण्याची मागणी

बीड : शहरातील शहर पोलीस ठाणे ते जिजामाता चौकपर्यंत असणाऱ्या डीपी रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडलले आहेत. नगर पालिकेने ते खड्डे तत्काळ दुरूस्त करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने खड्डे बुजविण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Shrimad Bhagwat's story begins in Telgaon