श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची मान जगात उंचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:29+5:302021-03-13T04:58:29+5:30
अनिल गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क कुसळंब : वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्न असलेल्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड ...

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची मान जगात उंचावली
अनिल गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्न असलेल्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ संस्कृत महाविद्यालयाचा छात्र गणेश देशमुख याने पूर्व माध्यमा परीक्षेत विद्यापीठातील ५७२ शाळांमधून ९४.८ टक्के गुण संपादन करत देशात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात २०१८मध्ये श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती तथा महंत विठ्ठल महाराज यांच्या अथक परिश्रमातून संत वामनभाऊ संस्कृत महाविद्यालयाला मान्यता मिळाली. येथे सहावी ते शास्त्री बी. ए. तृतीय वर्ष अशी मान्यता आहे. येथे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण दिले जाते. गडाच्यावतीने मोफत निवास आणि भोजनाची सुविधा ज्ञान ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या विद्यालयातील गणेश देशमुख हा नववी ते दहावी पूर्व माध्यमा या वर्गातून विद्यापीठातील ५७२ शाळांमधून देशात सर्वप्रथम आला आहे. दरम्यान, २ मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, विदेश मंत्रालयाचे अपर सचिव अखिलेश मित्र यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गणेशचा गौरव करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संत वामनभाऊ संस्कृत महाविद्यालयाचे अध्यापक शेख, प्रा. तिवारी, प्रा. पाण्डे यांच्यासह सुडके महाराज (संगीत) यांचे मार्गदर्शन लाभले.
संत वामनभाऊंचा आशीर्वाद, अध्यापकांचे परिश्रम
मोठ्या कष्टातून २०१८मध्ये श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाशी संलग्न संस्कृत विद्यालयाला मान्यता मिळाली. त्यानंतर यावर्षी या विद्यालयाने मोठी झेप घेतली. येथील अध्यापक व शिक्षकांच्या कठोर परिश्रमातून येथील विद्यार्थी देशात प्रथम आला आहे. हा भाऊंचा कृपाप्रसाद म्हणावा लागेल. संत वामनभाऊंच्या पवित्र भूमीत ज्ञानाच्या अंकुराने न्हाऊन निघालेला हा विद्यार्थी देशपातळीवर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित होतो; ही बाब अध्यात्म क्षेत्रातील बीड जिल्हावासीयांच्या दृष्टीने आनंदाची आहे.
- प्रा. बिभिषण चाटे, मराठी भाषा वाड्:मय अभ्यासक
===Photopath===
110321\11bed_5_11032021_14.jpg
===Caption===
पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ संस्कृत महाविद्यालयाचा छात्र गणेश देशमुख याने पूर्व माध्यमा परीक्षेत देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.