सुट्ट्या नाण्यांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:43+5:302021-07-02T04:23:43+5:30

बीड : नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात चिल्लरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार ...

Shortage of holiday coins | सुट्ट्या नाण्यांची टंचाई

सुट्ट्या नाण्यांची टंचाई

बीड : नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात चिल्लरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत.

संरक्षक कठड्याची गरज

धानोरा : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोराफाटा दरम्यान रस्त्याच्या वळणावर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक कठडे तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संरक्षक कठडे तातडीने बांधावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पाणीपातळीत घट

बीड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून विहिरी व इंधन विहिरीच्या पाणीपातळीवर परिणाम होऊ लागला आहे. काही भागात विहिरी तळ गाठू लागल्या आहेत.

रस्त्यावर स्टंटबाजी

अंबाजोगाई : शहरात सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असतानाही युवक रात्रीच्या वेळी दुचाकीवर ट्रिपलसीट बसून विविध प्रकारची स्टंटबाजी करत आहेत. तसेच काही भागात रस्त्यावर क्रिकेट व इतर खेळ खेळले जात आहेत.

रीडिंगविना बिले

बीड : गेल्या अनेक दिवसांपासून जे वीज बिल दिले जात आहे, ते अनेकदा रीडिंग न घेताच दिले जाते. ग्रामीण भागात तर हा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी वीज बिल मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी ग्राहक कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत.

Web Title: Shortage of holiday coins