वीकेंडलाही दुकाने सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:26+5:302021-07-12T04:21:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यामुळे अनेक व्यवसाय सुरू करण्यासाठी शिथिलता ...

वीकेंडलाही दुकाने सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यामुळे अनेक व्यवसाय सुरू करण्यासाठी शिथिलता देण्यात आली. मात्र, आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांना बंदचे आदेश दिले होते. असे असतानाही शहरातील हाॅटेल, भोजनालय, चहाची हाॅटेल, फळाची हातगाडे, जनरल स्टोअर्स, मोबाइल शाॅपीसह विविध दुकाने सुरू आहेेत. शासनाच्या सर्व नियमाची पायमल्ली होत असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बाजारपेठेत गर्दी होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असतानाही ४ वाजल्यानंतर देखील उशिरापर्यंत दुकाने चालू ठेवल्या जात आहेत. याकडे नगर परिषद, पोलीस, महसूलचे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.