धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराने ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:54+5:302021-08-01T04:30:54+5:30

गोरगरीब जनतेच्या तोंडातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार करून आपल्या पोळीवर तूप ओढणाऱ्या जिल्ह्यातील एका गलेलठ्ठ अडत दुकानदाराचे नाव समोर आल्याने ...

The shopkeeper who black-marketed the grain hit Dhoom | धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराने ठोकली धूम

धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराने ठोकली धूम

गोरगरीब जनतेच्या तोंडातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार करून आपल्या पोळीवर तूप ओढणाऱ्या जिल्ह्यातील एका गलेलठ्ठ अडत दुकानदाराचे नाव समोर आल्याने त्याने आता नेकनूर येथून इतरत्र कुठेतरी धूम ठोकली असून, त्याला पकडण्याचे आता पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. आजवर त्याने किती माल काळ्याबाजारात विकला हे त्याला पकडल्यावरच समोर येईल. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.

आष्टी पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या किनारा चौकात आयशर टेम्पो

क्रमांक एमएच-१६ एई-९६१६ हा पकडला होता. यात रेशनचा गहू, तांदूळ असल्याचे निष्पन्न होताच दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पो चालकाला अटक केल्यानंतर तो नेकनूर येथील एका अडत दुकानदारांचा माल असल्याचे समोर आले. पोलिसांनी थेट नेकनूर गाठत सदरील अडत दुकानदारांचा शोध घेतला; पण त्याने हा सगळा प्रकार अंगलट आल्याचे समजातच गावातून धूम ठोकली आहे. त्याने आजवर परजिल्ह्यात किती माल काळ्याबाजारात विकला हे त्याला पकडल्यानंतरच समोर येणार असले तरी त्या गलेलठ्ठ अडत दुकानदाराला पकडणे आष्टी पोलिसांसमोर एक आव्हान उभे ठाकले आहे. हा अडत्या स्वत:ला वाचवण्यासाठी लक्ष्मीअस्त्राचा प्रयोग करत असल्याची कुजबुज कानावर पडत आहे.

Web Title: The shopkeeper who black-marketed the grain hit Dhoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.