शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांच्या वेळा वाढवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्र आहेत. पावसाळ्यात ...

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्र आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबा ओसंडून वाहत असल्याने येथे अनेकजण फिरण्यासाठी जातात. अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पाणी साठविण्याची गरज

अंबाजोगाई : दरवर्षी अंबाजोगाई शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मोठा पाऊस होऊनही आठवड्यातून एकदा पाणी मिळते. मात्र तरीसुद्धा रेनवॉटर हार्वेस्टिंग बाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेच्या वतीने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन व्हॉटर हार्वेस्टिंग उपक्रम आपल्या घरी केल्या मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची अडचण

अंबाजोगाई : पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा असते. अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होतात. काहीजण आठवी पासून तर काहीजण अकरावीपासून एनसीसीची निवड करतात. मात्र कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयात एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असून भविष्याची त्यांना चिंता सतावत आहे.

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे गरजेचे

अंबाजोगाई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. परंतु, ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देतात. परंतु, ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जावून साधी माहिती घेत नाही, त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

एक खिडकी योजना राबवा

अंबाजोगाई : प्रत्यक्ष शाळा सुरु झाली नसली तरी ऑनलाईन शाळा सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्राची गरज भासत आहे. शासनाने मागील काही वर्षापूर्वी एक खिडकी ही योजना राबवून शिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्याची मोहीम राबवली होती. कोरोनाचा काळ असल्याने एक खिडकी मोहीम राबवावी, अशी मागणी ॲड. सुभाष शिंदे यांनी केली आहे.