शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 18:33 IST

Newly married young man committed suicide: सत्यनारायण पूजा झाल्यानंतर नवरदेवाने शेतात जाऊन केली आत्महत्या

माजलगाव( बीड ) : शनिवारी मोठ्या थाटात लग्न केल्यानंतर नवरी-नवरदेवाने नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आज सत्यनारायण पूजा करण्यात आली. मात्र, सत्यनारायण पूजा संपताच नवरदेवाने शेतात जाऊन आत्महत्या ( Newly married young man committed suicide) केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी तालुक्यातील नित्रुड येथे घडली. पांडुरंग डाके असे मृत तरुणाचे नाव आहे. 

नित्रुड येथील पांडुरंग रामकिसन डाके (२६ ) हा शेती करत होता. त्याचे शनिवारी माजलगाव येथील मुलीसोबत थाटामाटात लग्न झाले. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास नव्या नवरी-नवरदेवासाठी सत्यनारायण आयोजित करण्यात आला. लग्नानंतर नव्या आयुष्याची होणार असल्याने पांडुरंग आनंदित होता. मात्र, सत्यनारायण झाल्यानंतर पाहुणे, ग्रामस्थांच्या पंगती बसलेल्या असताना पांडुरंग कोणालाही न सांगता थेट शेतात गेला. शेतात पांडुरंग याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील शेतकऱ्याने ही घटना पाहताच पांडुरंगच्या घरी याची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलीस घ्तानास्थाली दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. पांडुरंगच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूmarriageलग्न