धक्कादायक ! नात्यातील महिलेचे अपहरण करून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 01:24 PM2020-11-03T13:24:45+5:302020-11-03T13:27:59+5:30

पुण्यात रात्री ९.३० वाजता तिला एका लॉजमध्ये नेऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत दोनदा अत्याचार केला.

Shocking! Kidnapping and raping a woman in a relationship | धक्कादायक ! नात्यातील महिलेचे अपहरण करून बलात्कार

धक्कादायक ! नात्यातील महिलेचे अपहरण करून बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देपिडीतीच्या नातेवाईकावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पिडीतेला मारहाण करून त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि थेट पुण्याला घेऊन गेला.

अंबाजोगाई : नात्यातील महिलेचे घरातून अपहरण करून पुण्याला नेले. तिथे एका लॉजमध्ये जीवे मारण्याच्या धमक्या देत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी त्या नातेवाईकावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
दिगांबर उर्फ मुन्ना सुरेश गोरे असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या नात्यातील २४ वर्षीय पिडीत महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पिडीतेच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि.३०) दुपारी १ वाजताच्या सुमारास ती लोखंडी सावरगाव येथील घरात असताना दिगंबर तिथे आला. पिडीतेला मारहाण करून त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि थेट पुण्याला घेऊन गेला. पुण्यात रात्री ९.३० वाजता तिला एका लॉजमध्ये नेऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत दोनदा अत्याचार केला. त्यानंतर दोन दिवस त्याने पिडीतेला पुण्यात विविध ठिकाणी फिरवले. 

पीडिता रडू लागल्याने तिला घेऊन दिगांबर रविवारी (दि.०१) रात्री लोखंडी सावरगावसाठी निघाले. परंतु, पुण्याला परत जाण्याच्या बहाण्याने तो वाटेतच केज येथे उतरला. त्यानंतर पिडीतेने अंबाजोगाई बस स्थानकावर उतरून पतीला फोन लावला, पण तो न आल्याने तिने अंबाजोगाई ग्रामीण ठाणे गाठून झालेल्या अत्याचारा बाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून दिगांबर उर्फ मुन्ना सुरेश गोरे याच्यावर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पीएसआय व्ही.बी. केंद्रे करत आहेत.

Web Title: Shocking! Kidnapping and raping a woman in a relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.