शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 17:00 IST

दुष्काळामुळे शेतीत काहीही पिकले नाही आणि मजुरीही मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत आत्महत्या

ठळक मुद्देरुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू गुरुवारी घेतले होते विष 

बीड :  बीड तालुक्यातील ईट येथील आसाराम रावसाहेब नरनाळे या शेतकऱ्याने आठवडी बाजारासाठी पैसे नसल्यामुळे मागील आठवड्यात गुरुवारी विष प्राशन केले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हृदयस्पर्शी दुर्देवी घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आसाराम नरनाळे यांचेकडे ईट येथे एक एकर शेती आहे, शेतीसह मोलमजुरी करून ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. दुष्काळामुळे त्यांच्या  शेतीत काहीही पिकले नाही, तसेच मजुरीही मिळत नसल्याने रोजचा खर्च भागवण्याएवढे पैसे देखील त्यांच्याकडे राहत नव्हते. याच मानसिकतेमधून ते खचून गेले होते. मागील गुरुवारी पिंपळनेर येथे आठवडी बाजार होता. मात्र, खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आसाराम यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गणपत डोईफोडे यांनी दिली. 

शासनाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.. यातील सर्वाची कारणे जवळपास सारखी असल्याचे दिसून येते मात्र, तरी देखील उपाययोजना प्रभावीणपणे राबवल्या जात नसल्यामुळे आत्महत्या रोखण्यात यश येत नसल्याची तज्ज्ञांचे मत आहे.२०१८ साली विविध कारणांमुळे १९१ शेतकऱ्यांनी आत्हत्या केल्या होत्या, पैकी १५० पेक्षा अधिक प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरले होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीdroughtदुष्काळBeedबीड