धक्कादायक; पुरलेल्या अर्भकाचे कुत्र्याने तोडले लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:15+5:302021-08-28T04:37:15+5:30
बीड : साधारण सहा दिवसांपूर्वी जन्मलेले व चार दिवसांपूर्वी पुरलेल्या पुरूष जातीच्या अर्भकाचे चक्क कुत्र्याने लचके तोडले. हा धक्कादायक ...

धक्कादायक; पुरलेल्या अर्भकाचे कुत्र्याने तोडले लचके
बीड : साधारण सहा दिवसांपूर्वी जन्मलेले व चार दिवसांपूर्वी पुरलेल्या पुरूष जातीच्या अर्भकाचे चक्क कुत्र्याने लचके तोडले. हा धक्कादायक प्रकार पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट परिसरात गुरूवारी मध्यरात्री उघड झाला आहे. पोलिसांकडून मातेचा शोध सुरू असून, रात्री उशिरापर्यंत अंमळनेर ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
पोलिसांच्या माहितीनुसार, सावरगाव घाट परिसरात एक वस्ती आहे. गुरूवारी रात्री काही शेतकऱ्यांना बांधाच्या कडेला कुत्रे दिसले. त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना संशय आल्याने अंमळनेर पोलिसांना माहिती दिली. आरोग्य विभागाला पाचारण करून पंचनाम्यासहीत अर्भकाला शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. येथे बालरोगतज्ज्ञ डॉ. इलियास खान यांनी त्याची तपासणी केली. ज्या मातेेने या बाळाला जन्म दिला, तिच्या गर्भाचे दिवस पूर्ण भरलेले होते. बाळ तंदुरूस्त व सदृढ होते. सहा दिवसांपूर्वी साधारण त्याचा जन्म झाला असावा आणि चार दिवसांपूर्वी मृत्यू. अर्भकाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी त्याची तपासणी केली असता डावा पाय आणि डोके कुत्र्याने खाल्ले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून अर्भकाला अंमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
--
पोलिसांकडून मातेचा शोध सुरू
अर्भक सापडताच पोलिसांनी या परिसरात प्रसुत झालेल्या महिलांची माहिती घेण्यास सुरुवात केली. हा प्रकार अनैतिक संबंधांतून झाल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याच भागातील एका बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अविवाहित मुलीची नुकतीच प्रसुती झाल्याची माहिती मिळाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. त्यामुळे याच मातेवर संशय व्यक्त होत आहे. अद्याप या प्रकरणात काहीच नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
===
अर्भक साधारण चार दिवसांपूर्वी मयत झाले होते. अर्भकाचा डावा पाय व डोके काही प्रमाणात कुत्र्यांनी खाल्ले होते. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह पोलिसांकडे दिला आहे. बालरोग तज्ज्ञांसह इतर दोन सहकाऱ्यांना घेऊन शवविच्छेदन पूर्ण केले.
डॉ. मोहित कागदे, वैद्यकीय अधिकारी, वाहली