शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक: ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी; ३,४१५ महिलांना रक्तक्षय

By सोमनाथ खताळ | Updated: June 2, 2025 07:57 IST

१,५२३ गर्भवती महिलांनी केले उसाच्या फडात काम

सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी १ लाख ७५ हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. यापैकी ७८ हजार महिला मजूर आहेत. त्यातील ८४३ महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात ३० ते ३५ वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसेच, १,५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात कामासाठी जातात. सहा महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे आता याचा अहवाल तयार झाला आहे. यात महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून बैठकही घेण्यात आली आहे.

३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांची काढली गर्भपिशवी

ऊसतोडीला जाण्यापूर्वी जिल्ह्यातील ८४३ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली. त्यातही ३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांची शस्त्रक्रिया झाली आहे. अंगावरून जाणे, मासिक पाळीत रक्तस्राव होणे, जंतुसंसर्ग, पोटात दुखणे अशी लक्षणे या महिलांना असल्याचे सांगण्यात आले.

पोटात बाळ अन् दुसरीकडे पोटासाठी हाती कोयता

जिल्ह्यातील १,५२३ महिलांनी गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम केले. पोटात बाळ आणि पोटासाठी हाती कोयता, असा संघर्ष त्यांचा होता. या सर्व महिलांची नोंद माता व बाल संगोपन पोर्टलवर झाली आहे.

३,४१५ महिलांना रक्तक्षय

लोहाची कमतरता, बी-१२ आणि फॉलिक अँसिडची कमतरता, थलसेमिया, मासिक पाळी, शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे रक्तस्राव झाल्यास रक्तक्षय होतो. असाच त्रास असणाऱ्या ऊसतोड महिलांची संख्या ३,४१५ एवढी आहे.

  • १,१३२ गावांत महिला आरोग्य कृती दल कार्यरत
  • ४६,२३१ महिलांची ऊसतोडीला जाताना तपासणी
  • एकूण महिलांना झाले आहे हेल्थ कार्डचे वाटप
  • १५,६२४ सरकारी डॉक्टरांची परवानगी घेऊन २७९ शस्त्रक्रिया खासगीत झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. ८४३ महिला कामगारांची गर्भपिशवी शस्त्रक्रिया आणि १,५२३ महिला गर्भवती आहेत, हे खरे आहे.-डॉ. सचिन शेकडे, माता व बाल संगोपन अधिकारी, बीड

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाsugarcaneऊस