धक्कादायक : २२ रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:30+5:302021-05-24T04:32:30+5:30

शिरूर कासार : आपणास काहीच त्रास नसताना पाॅझिटिव्ह म्हणून कोरोना सेंटरमध्ये ठेवले असा गैरसमज धरून तब्बल २२ रुग्णांनी गुपचूप ...

Shocking: 22 patients escaped from Kovid Center | धक्कादायक : २२ रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढला पळ

धक्कादायक : २२ रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढला पळ

शिरूर कासार : आपणास काहीच त्रास नसताना पाॅझिटिव्ह म्हणून कोरोना सेंटरमध्ये ठेवले असा गैरसमज धरून तब्बल २२ रुग्णांनी गुपचूप पलायन केले. ही घटना शिरूर येथील शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये उघडकीस आली. यानंतर येथील सेंटरचे प्रमुख डॉ. विजय राठोड यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिरुर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ठिकाणी नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. या दरम्यान, अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. या रुग्णांना उपचारासाठी शासकीय वसतिगृहात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. १४ ते २१ मेच्या दरम्यान, या सेंटरमधून आळीपाळीने तब्बल २२ कोरोनाबाधितांनी पळ काढल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कोविड सेंटरचे डॉ. विजय राठोड यांनी शनिवारी पोलिसात तक्रार दाखल केली.

शिरूरसह बावी, आनंदगाव, घोगस पारगाव, नारायणवाडी, पौंडूळ, मानूर, उकांडा, जांब, हिवरसिंगा, राळसांगवी, झापेवाडी, तागडगाव, दगडवाडी, ब्रह्मनाथ येळंब येथील कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांमुळे तालुक्यात आणखी कोरोनाच्या प्रसाराची भीती वाढली आहे. डॉ. राठोड यांच्या दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कोरोना संसर्गाचा प्रसार होईल असे कृत्य करून तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १४४ व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८, २६९,२७० सह कलम ५१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस जमादार कालीदास खेडकर हे करीत आहेत.

Web Title: Shocking: 22 patients escaped from Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.