महावितरणला 'शॉक'; २४ तासांत वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST2021-04-09T04:35:47+5:302021-04-09T04:35:47+5:30

बीड : जिल्हा परिषद आराेग्य विभागाच्या औषधी भांडारमध्ये आकडा टाकून वीज चोरी केली जात होती. महावितरणकडे कोटेशन भरुनही वीज ...

'Shock' to MSEDCL; 24 hour power supply | महावितरणला 'शॉक'; २४ तासांत वीज पुरवठा

महावितरणला 'शॉक'; २४ तासांत वीज पुरवठा

बीड : जिल्हा परिषद आराेग्य विभागाच्या औषधी भांडारमध्ये आकडा टाकून वीज चोरी केली जात होती. महावितरणकडे कोटेशन भरुनही वीज कनेक्शन मिळत नव्हते. हा सर्व प्रकार 'लोकमत'ने स्टींंग ऑपरेशन करुन गुरुवारी चव्हाट्यावर आला. याचा आरोग्य विभागाला तर दणका बसलाच शिवाय महावितरणलाही चांगलाच 'शॉक' लागला. अवघ्या २४ तासांत नवे वीज कनेक्शन देऊन भांडारमध्ये नवे मिटर बसविण्यात आले. पहिल्यांदाच येथे अधिकृत विजेचा झगमगाट झाला.

जिल्हा रुग्णालयाच्या जागेत उभारलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या औषधी भांडारमध्ये अधिकृत वीज कनेक्शन नव्हते. महावितरणकडे नवीन मिटर मिळावे, यासाठी २० हजार रुपये कोटेशनही २४ मार्च रोजी भरले होते. परंतू महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोग्य विभागाने मुख्य वाहिणीवर आकडा टाकून वीज घेतली. हा प्रकार 'लोकमत'ने गुरुवारी 'स्टींग ऑपरेशन' करुन चव्हाट्यावर आला. याने आरोग्य विभागासह महावितरणला चांगलाच झटका बसला. महावितरण अधिकाऱ्यांनी सकाळीच आरोग्य विभागात धाव घेत औषधी भांडारमध्ये वीज जोडणी करुन मिटर जोडणीची कारवाई सुरु केली. दुपारनंतर येथे मिटर बसविण्यात आले. भांडार उभारल्यापासून पहिल्यांदाच या विभागात अधिकृतपणे वीजेचा झगमगाट झाला.

महावितरणच्या कारभारात 'अंधार'

शासकीय कार्यालयात नवे वीज कनेक्शन देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जाते. सामान्यांना तर महिनाभर प्रतिक्षा करावी लागते. मिटर नाही, वरिष्ठांकडे मागणी केली, अशी उडवाउडवीची उत्तरे महावितरणचे अभियंता देतात. अभियंतांच्या गलथानपणामुळे महावितरणच्या कारभारात कायम 'अंधार' असल्याचे दिसते. येथील अति.कार्यकारी अभियंता सुयोग पाटाणकर यांच्याकडूनही ग्राहकांना केवळ गोड बोलून परत पाठविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. केवळ 'वसूली'वर भर देऊन सामान्य ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात हा विभाग सध्या अपयशी ठरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

'लोकमत'मुळे भांडारमध्ये 'प्रकाश'

मागील दोन महिन्यांपासून वीज कनेक्शन अभावी येथे अनंत अडचणी येत होते. महावितरणच्या कारभाराला वैतागून येथे आकडा टाकून वीज घेतली होती. अखेर 'लोकमत'ने हे प्रकरण उघडकीस आणले आणि औषधी भांडारमध्ये वीजेचा प्रकाश पडला.

कोट

आरोग्य विभागाच्या औषधी भांडारमध्ये वीज कनेक्शन देण्याबाबत शाखा अभियंतांना सुचना केल्या होत्या. तेथे मिटर बसविण्यात आले आहे.

सुयोग पाटाणकर, अति.कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय माळीवेस बीड

===Photopath===

080421\082_bed_18_08042021_14.jpg

===Caption===

०८ एप्रिल रोजी लोकमतने केलेले स्टींग ऑपरेशन

Web Title: 'Shock' to MSEDCL; 24 hour power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.