शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शॉक ! ६० लाख रुपये खर्चूनही जीव धोक्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:58 IST

वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे. त्यामुळे महावितरणनकडून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम केले जात असल्याचे समोर येत आहे. पाच तालुक्यांतील खर्चाचा आकडा ऐकून आणि सुविधांचा अभाव पाहता सर्वसामान्यांनाही ‘शॉक’ बसला आहे.महावितरणकडून वर्षभर दुरूस्तीची कामे केली जातात. बीड विभागांतर्गत बीड शहरासह बीड ग्रामीण, आष्टी, पाटोदा, शिरूर व गेवराई तालुक्यांचा समावेश आहे. या पाच तालुक्यांत मागील वर्षभरात वाकलेले खांब, पडलेले खांब दुरूस्त करणे, लोंबकाळलेल्या तारा ताणने, रोहित्र संचासह वितरण पेटीची देखभाल करण्यासाठी तब्बल ६० लाख रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले. लाखो रुपयांची उधळपट्टी करूनही बीड शहरासह पाच तालुक्यांमधील खंडित वीज पुरवठा होण्याची परंपरा कायमच आहे. तसेच वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा जैसे थे दिसून येतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यावरही खर्च केला जातो. असे असले तरी थोडेही वादळ आले किंवा पाऊस आला की तासनतास वीज पुरवठा खंडित होता. याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.प्रामाणिक ग्राहकांनी बीले भरूनही सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.गुत्तेदारांसोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटेज्या गुत्तेदारांना दुरूस्तीसह इतर कामे दिले आहेत, त्यांच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. कामाच्या एकुण रकमेच्या तुलनेत ५ ते १५ टक्के रक्कम काही अधिकारी घेत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच दुरूस्तीचे कामे निकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.वादळ नसताना अन् वीजपुरवठा सुरू असताना तुटली तारसाधारण पंधरा दिवसांपूर्वी सहयोगनगर भागातील स्टेडियमकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू असताना अचानक तार तुटून पडली. हा रस्ता तसा वर्दळीचा. सुदैवाने परिसरातील लोकांनी पाहिल्याने रस्ता अडविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हाच प्रकार जर रात्रीच्या सुमारास झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतरही महावितरण शहरातील तारा दुरूस्ती व तार ताणण्याबाबत जागरूक झाले नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजfundsनिधी