महाशिवरात्रीला प्रथमच शिवालये बंद; दर्शन परंपरेला पडला खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:28+5:302021-03-13T04:59:28+5:30
तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथील उत्तरेश्वर यात्रा उत्सव अनेक वर्षांच्या कालखंडानंतर रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर आडकेश्वर (आडस), निळकंठेश्वर (केज), ...

महाशिवरात्रीला प्रथमच शिवालये बंद; दर्शन परंपरेला पडला खंड
तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथील उत्तरेश्वर यात्रा उत्सव अनेक वर्षांच्या कालखंडानंतर रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर आडकेश्वर (आडस), निळकंठेश्वर (केज), बनेश्वर (बनसारोळा) व तांबवेश्वर (तांबवा) या शिवालयांसह ग्रामदैवत असणारे शिवमंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला बंद ठेवण्यात आल्याने भाविकांना प्रत्यक्ष शिवदर्शनाचा लाभ घेता आला नाही. शिवमंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामस्थांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत बंद मंदिराच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन शिवदर्शन घेण्यातच समाधान मानले.
दरम्यान, तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी मंदिर परिसरात भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
मंदिर परिसरात दिनकर पुरी, अमोल गायकवाड, धनपाल लोखंडे, हनुमंत चादर, अशोक गवळी, दिलीप गित्ते, बाळासाहेब अहंकारे, भास्कर सिरसट, जीवन करवंदे, सिद्धेश्वर डोईफोडे, आघाव, शिंदे तसेच गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचारी बंदोबस्तावर आहेत.
फोटो.
उत्रेश्वर पिंपरी येथील मंदिरासमोर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
===Photopath===
110321\deepak naikwade_img-20210311-wa0025_14.jpg
===Caption===
उत्रेश्वर पिंपरी येथील मंदिरासमोर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.