बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सवतींमध्येच ‘फ्री स्टाईल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:22 IST2017-12-09T01:22:09+5:302017-12-09T01:22:13+5:30

पती, दुसरी पत्नी आणि त्यांच्याविषयी तक्रार देण्यासाठी आलेली पहिली पत्नी यांच्यात पोलीस ठाण्यातच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी जुंपल्याची घटना बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडली.

 Shivajinagar police station in Beed city 'freestyle' among all! | बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सवतींमध्येच ‘फ्री स्टाईल’!

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सवतींमध्येच ‘फ्री स्टाईल’!

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पती, दुसरी पत्नी आणि त्यांच्याविषयी तक्रार देण्यासाठी आलेली पहिली पत्नी यांच्यात पोलीस ठाण्यातच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी जुंपल्याची घटना बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी सदरील पती आणि त्याच्या दोन्ही पत्नींवर गुन्हा दाखल केला.

बीड शहरातील अंबिका नगर येथील महिला काल सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास तिचा पती आणि सवती विरोधात तक्रार देण्यासाठी ठाण्यात आली होती. याच वेळेस तिचा पती (रा. काकडहिरा ह.मु. कालिका नगर, बीड) हा दुसºया पत्नीसोबत ठाण्यात आला आणि तू आमच्याविरोधात खोटी फिर्याद का देत आहेस, असे म्हणत त्यांच्यात वाद सुरु झाला. वाद टोकाला जाऊन पोलीस ठाण्यातच त्यांच्यामध्ये हाणामारी सुरु झाली.

Web Title:  Shivajinagar police station in Beed city 'freestyle' among all!