शिवसेनेने झिरोतून हिरो केलेल्या गद्दारांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये - चंद्रकांत खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:20 AM2019-10-15T00:20:48+5:302019-10-15T00:21:40+5:30

शिवसेनेने झिरोतून हिरो केलेले बीडमधील काही गद्दार शिवसेना सोडून गेले. आता हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता जयदत्तआण्णांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

Shiv Sena's traitors who have beaten Zero should not teach us loyalty - Chandrakant Khair | शिवसेनेने झिरोतून हिरो केलेल्या गद्दारांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये - चंद्रकांत खैरे

शिवसेनेने झिरोतून हिरो केलेल्या गद्दारांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये - चंद्रकांत खैरे

Next
ठळक मुद्देमहायुतीच्या बीड येथील कॉर्नर बैठकीत प्रतिपादन : विकासाचे दिले आश्वासन

बीड : शिवसेनेने झिरोतून हिरो केलेले बीडमधील काही गद्दार शिवसेना सोडून गेले. आता हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता जयदत्तआण्णांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
पिंपरगव्हाण रोड आणि भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरात एका कॉर्नर बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे भाजप-शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयत क्र ांती महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, दिलीप गोरे, नितीन धांडे, सुनील सुरवसे, सुनील अनभुले, अजय सवाई, संपदा गडकरी, संगीता चव्हाण, गोरख शिंगण, सागर बहीर, चंद्रकला बांगर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप गोरे यांनी केले.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, जयदत्त क्षीरसागरांसारखा विकासाभिमुख नेता आहे. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्यांचे नेटवर्क मोठे आहे. त्यांना सर्व समाज मानतो. सर्वच क्षेत्रातील मतदार त्यांच्या पाठीशी उभा आहे. आज असा नेता आज शिवसेनेत आला आहे. मध्यंतरी बीडमध्ये ज्यांची कधीच निष्ठा शिवसेनेवर नव्हती असे शिवसैनिक झाले होते. तेच गद्दार आज राष्ट्रवादीत गेले आहेत. ज्यांच्यासाठी शिवसैनिकांनी काठ्या लाठ्या खाल्ल्या, गावागावात दुश्मनी अंगावर ओढून घेतली, त्या गद्दारांनी पक्ष सोडला. आज हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. शिवसेनेने त्यांना आमदार केले, मंत्री केले हे आज शिवसेनेचे उपकार विसरून दुसऱ्यांचे गुणगान करत आहेत. मराठवाड्याच्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी जयदत्तअण्णासारखा लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी काम करणारा जयदत्त क्षीरसागरसारखा नेता निवडून द्या, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की बीड शहर, जिल्ह्यासाठी जयदत्त क्षीरसागरांचे खूप योगदान आहे. त्यामुळे जयदत्त आण्णांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
वाढत्या भागापर्यंत सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबध्द : जयदत्त क्षीरसागर
जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, विकासाची जी कामे प्रलंबित आहेत, ती आगामी काळात नक्कीच पूर्ण होतील. अमृत अटल पाणीपुरवठा आणि भूमीगत गटार योजनेची कामे शहरात चालू आहेत.
ही कामे करताना जनतेला थोडा त्रास होत आहे. परंतु येत्या सहा महिन्यानंतर बीड शहरातील रस्ते चकाचक झाले असतील, याबद्दल शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही.
ही कामे पूर्ण झाल्यानंतर बीड शहर स्वच्छ होईल, नियमित पाणीपुरवठा होईल. वाढत्या भागापर्यंत सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. विकासाला निधीची गरज असते, नुसत्या गप्पा मारून विकास होत नाही.
महायुतीचा विजय निश्चित आहे. त्यात बीडची जागा सर्वाधिक मतांनी विजयी झाली पाहिजे. मतदारांनी भूलथापांना बळी न पडता धनुष्यबाणावर मतदान करून विजयी करावे असे ते म्हणाले.

Web Title: Shiv Sena's traitors who have beaten Zero should not teach us loyalty - Chandrakant Khair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.